शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई सुवर्णपदक विजेत्या खेळाडूच्या घरी वन अधिकाऱ्यांचा छापा; मुख्यमंत्री म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 14:42 IST

स्वप्नाने २०१८ च्या आशियाई स्पर्धेत हेप्टाथ्लॉनमध्ये सुवर्णपदक जिंकले होते

अर्जुन पुरस्कार विजेत्या स्वप्ना बर्मन हिच्या जलपाईगुडी येथील घरावर वन विभागानं छापा टाकला. तिने घरी अनधिकृतपणे लाकडांचा साठा केल्यामुळे वन विभागानं ही धाड टाकली. त्यानंतर राज्य सरकारने वन अधिकाऱ्याची बदली केली, परंतु स्थानिकांनी राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात आंदोलन केले आहे. 

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वप्ना बर्मन हिला क्लीनचीट दिली आहे. राज्य सरकारने वन अधिकारी संजय दत्ता यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. संजय दत्ता हे बैकुंठापूर वन विभागातील बेलाकोबा येथील अधिकारी होते. राज्य सरकारच्या या निर्णयाला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे आणि दत्ता यांच्या बदलीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली जात आहे. 

दत्ता आणि त्यांच्या टीमने १३ जुलैला स्वप्ना बर्मनच्या घरी छापा टाकला आणि त्यांना तिच्या घरी अनधिकृतपणे लाकडांचा साठा केलेला सापडला, अशी माहिती सूत्रांनी दिली. ही लाकडं खरेदी केल्याची कोणतीही पावती बर्मनकडे नव्हती, असेही सूत्रांनी सांगितले. 

ममता बॅनर्जी म्हणाल्या," घराचं काम करण्यासाठी स्वप्नानं ही लाकडं खरेदी केली होती. राजबंशी समुदायातील ती एक चांगली खेळाडू आहे. मी तिचा आदर करते. राज्य सरकारला कोणतीही कल्पना न देता काही वन अधिकाऱ्यांनी हा छापा टाकला. त्यांनी आम्हाला विचारले असते, तर त्यांना परवानगी दिली नसती."

स्वप्नाने २०१८ च्या आशियाई स्पर्धेत हेप्टाथ्लॉनमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. बॅनर्जी यांनी बर्मनशी फोनवर चर्चा केली. 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाMamata Banerjeeममता बॅनर्जी