आशियाई गोल्ड मोठे यश : मेरी कोम
By Admin | Updated: October 14, 2014 00:39 IST2014-10-14T00:39:28+5:302014-10-14T00:39:28+5:30
इंचियोनमधील आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणो हे माङयासाठी मोठे यश होते, असे मत भारताची अव्वल बॉक्सर एम़ सी़ मेरी कोम हिने व्यक्त केले आह़े

आशियाई गोल्ड मोठे यश : मेरी कोम
नवी दिल्ली : इंचियोनमधील आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणो हे माङयासाठी मोठे यश होते, असे मत भारताची अव्वल बॉक्सर एम़ सी़ मेरी कोम हिने व्यक्त केले आह़े
येथे आयोजित एका कार्यक्रमात मेरी कोम हिला ‘सर्वात बहुमूल्य खेळाडू’ म्हणून सॅमसंगतर्फे गौरविण्यात आले, त्या प्रसंगी ती बोलत होती़ ती म्हणाली, ग्वांग्झू येथे झालेल्या गत आशियाई स्पर्धेत मला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले होते;मात्र इंचियोनमधील आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकण्याचे लक्ष्य घेऊनच रिंगमध्ये उतरले होत़े स्पर्धेत सुवर्णच मिळविले हे मोठे यश होत़े
विशेष म्हणजे आशियाई स्पध्रेपूर्वी अनेकांनी माङया क्षमतेवर प्रश्न उपस्थित केला होता; मात्र
मी कुणाच्याही टीकेकडे लक्ष न
देता आपल्या खेळावर लक्ष्य
केंद्रित केल़े त्यामुळेच हे यश
संपादन करता आले आहे, असेही ती म्हणाली़
भारतात महिला खेळाडूही स्पर्धामध्ये मोठे यश मिळवू शकतात़ त्यामुळे महिला खेळाडूंप्रती
नकारात्मक नव्हे, तर सकारात्मक दृष्टिकोन ठेवणो आवश्यक आह़े भारतात महिलांना खेळांमध्ये पुढे जाण्यासाठी खूपच कमी संधी देण्यात येते;मात्र आता बदलत्या काळानुसार महिलांप्रतीचा दृष्टिकोन बदलून
त्यांना जास्तीत जास्त संधी द्यायला हवी, तरच महिला विविध स्पर्धामध्ये पदके मिळवू शकतील, असेही मेरीने म्हटले आह़े (वृत्तसंस्था)