शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games: महिला तिरंदाजांकडून सुवर्णवेध, भारताच्या खात्यात १९ वं गोल्ड मेडल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 11:38 IST

Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय तिरंदाजांची सोनेरी घौडदौड कायम आहे. आज भारताच्या महिला तिरंदाजांनी कंपाऊंड वुमन्स तिरंदाजीच्या अंतिम सामन्यात चायनिज तायपै (तैवान) ला पराभूत करत भारताच्या झोळीत आखणी एका सुवर्णपदकाची भर घातली आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय तिरंदाजांची सोनेरी घौडदौड कायम आहे. आज भारताच्या महिला तिरंदाजांनी कंपाऊंड वुमन्स तिरंदाजीच्या अंतिम सामन्यात चायनिज तायपै (तैवान) ला पराभूत करत भारताच्या झोळीत आखणी एका सुवर्णपदकाची भर घातली आहे. यंदाच्या स्पर्धेतील भारताचं हे १९ वं सुवर्णपदक ठरलं आहे. अदिती, ज्योती आणि परनीत कौर या त्रिकुटाने ही कमाल करत भारताला हे सुवर्णपदक जिंकून दिले आहे. त्याबरोबरच भारताच्या खात्यातील एकूण पदकांची संख्या ही ८२ एवढी झाली आहे.

भारताच्या महिला तिरंदाजांनी कंपाउंड वुमन्स तिरंदाजीच्या उपांत्य फेरीत इंडोनेशियावर २३३-२१९ अशी मात करत अंतिम फेरी गाठली. त्यानंतर अंतिम फेरीमध्ये तैवानच्या तिरंदाजाचं कडव आव्हान मोडीत काढत सुवर्णपदकावर निशाणा साधला.

दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये ११ व्या दिवशी भालाफेकीमध्ये नीरज चोप्राने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते. तसेच तिरंदाजीच्या मिश्र गटातही एका सुवर्णपदकावर भारतीय तिरंदाजंनी नाव कोरले होते. चार बाय ४०० मीटर रिलेमध्येही भारताच्या खात्यात एक सुवर्णपदक जमा झाले होते. कालच्या स्पर्धेच्या ११ व्या दिशवी भारताने ३ सुवर्णपदकांसह एकूण ११ पदके जिंकली होती.  

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Indiaभारत