नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात भाला बराच लांब फेकला, पण आयोजकांमुळे गोंधळ झाला अन्.. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 04:53 PM2023-10-04T16:53:26+5:302023-10-04T16:53:50+5:30

Asian Games 2023 Neeraj Chopra : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये विक्रमी पदकांची कमाई केली.

Asian Games 2023 Neeraj Chopra : Neeraj Chopra comes up with a big effort in his first attempt but there is some technical problem and that is why the distance is not confirmed yet  | नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात भाला बराच लांब फेकला, पण आयोजकांमुळे गोंधळ झाला अन्.. 

नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात भाला बराच लांब फेकला, पण आयोजकांमुळे गोंधळ झाला अन्.. 

googlenewsNext

Asian Games 2023 Neeraj Chopra : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये विक्रमी पदकांची कमाई केली. भारताने आतापर्यंत ७४ पदकं जिंकली आणि ही आशियाई स्पर्धेतील भारताची आतापर्यंतची सर्वाधिक पदकं ठरली. त्यापैकी सर्वाधिक २३ पदकं ही ॲथलेटिक्समध्ये मिळवलेली आहेत आणि आज त्यात आणखी भर पडणार हे पक्कं आहे. नेमबाजीत भारतीयांनी २२ पदकं जिंकली आहेत. नीरज चोप्राच्या ( Neeraj Chopra)च्या कामगिरीकडे आज सर्वांच्या नजरा होत्या आणि त्याने पहिल्याच प्रयत्नात ८५ मीटरच्या पार भाला फेकला. पण, १५-२० मिनिटे झाले तरी त्याने नेमकं किती अंतर पार केले हेच दाखवले नाही. त्यामुळे बराच गोंधळ उडाला. 


- भारतीय महिला कबड्डी संघाचे पदक पक्के! गटातील शेवटच्या सामन्यात थायलंडवर ५४-२२ असा विजय, उपांत्य फेरीत धडक.. भारतीय महिलांनी साखळी गटात दोन विजय व एक ड्रॉ असा निकाल लावला. 
- भारताच्या पुरुष हॉकी संघाने उपांत्य फेरीच्या लढतीत दक्षिण कोरियावर ५-३ असा विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. पुरुष संघाने १९६६, १९९८ आणि २०१४ मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. मागच्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. 
- स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत भारताच्या सौरव घोषालने फायनलमध्ये प्रवेश केला. त्याने उपांत्य फेरीत त्याने हेन्री लीयूंगचा ११-२, ११-१, ११-६ असा पराभव केला. 


भालाफेकीत नीरज चोप्रा आणि किशोर कुमार जेना हे दोन भारतीय जेतेपदाच्या शर्यतीत होते. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने दुखापतीमुळे माघार घेतली, तो मागील आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेता होता. २०१८मध्ये नीरजने ८८.०६ मीटर लांब भालाफेक करून आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते आणि जेतेपद कायम राखण्याचे आव्हान स्वीकारून तो मैदानावर उतरला. तैपेईचा चेंग चाओ-त्सून हा ९० मीटरच्या वर भालाफेकणारा पहिला आशियाई खेळाडू आहे आणि त्याचा आज पहिलाच प्रयत्न अपयशी ठरला.  तांत्रिक कारणामुळे नीरजचा पहिला प्रयत्नाची नोंद न झाल्याने त्याला पुन्हा भाला फेकावा लागला. 
 

Image

महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांमधील सोयी-सुविधा-सज्जता आणि एकंदर व्यवस्थेला तुम्ही १० पैकी किती गुण द्याल?

दहा (97 votes)
सात ते नऊ (169 votes)
चार ते सहा (556 votes)
एक ते तीन (1314 votes)
शून्य (2156 votes)

Total Votes: 4292

VOTEBack to voteView Results

Web Title: Asian Games 2023 Neeraj Chopra : Neeraj Chopra comes up with a big effort in his first attempt but there is some technical problem and that is why the distance is not confirmed yet 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.