शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
3
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
4
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
7
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
8
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
9
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
10
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
11
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
12
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
13
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
14
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
15
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
16
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
17
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
18
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
19
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
20
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय

Asian Games 2023 Neeraj Chopra : गोल्डही आपलं अन् सिलव्हरही! नीरज चोप्राने इतिहास रचला, किशोर जेनाने पराक्रम केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 18:05 IST

Asian Games 2023 Neeraj Chopra : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये विक्रमी पदकांची कमाई केली. भारताने आतापर्यंत ७६ पदकं जिंकली आणि ही आशियाई स्पर्धेतील भारताची आतापर्यंतची सर्वाधिक पदकं ठरली.

Asian Games 2023 Neeraj Chopra : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये विक्रमी पदकांची कमाई केली. भारताने आतापर्यंत ७६ पदकं जिंकली आणि ही आशियाई स्पर्धेतील भारताची आतापर्यंतची सर्वाधिक पदकं ठरली. त्यापैकी सर्वाधिक २६ पदकं ही ॲथलेटिक्समध्ये मिळवलेली आहेत. नीरज चोप्राच्या ( Neeraj Chopra)च्या कामगिरीकडे आज सर्वांच्या नजरा होत्या आणि त्याने ८८.८८ मीटर लांब ( सर्वोत्तम कामगिरी) भालाफेकून सुवर्णपदक निश्चित केले. भारताच्या किशोर कुमार जेनाने ८७.५४ मीटरसह रौप्यपदकावर नाव कोरले. महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत भारताने ३ मिनिटे २७.८५ सेकंदासह रौप्यपदक जिंकले. 

नीरज चोप्रा आणि किशोर कुमार जेना हे दोन भारतीय पदकाच्या शर्यतीत होतेच. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने दुखापतीमुळे माघार घेतली, तो मागील आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेता होता. २०१८मध्ये नीरजने ८८.०६ मीटर लांब भालाफेक करून आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तैपेईचा चेंग चाओ-त्सून हा ९० मीटरच्या वर भालाफेकणारा पहिला आशियाई खेळाडू आहे आणि त्याचा आज पहिलाच प्रयत्न अपयशी ठरला. नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८५ मीटरच्या पार भाला फेकला. पण, १५-२० मिनिटे झाले तरी त्याने नेमकं किती अंतर पार केले हेच दाखवले नाही. त्यामुळे बराच गोंधळ उडाला आणि तांत्रिक कारणामुळे त्याला पुन्हा भाला फेकावा लागला. त्यात त्याने ८२.३८ मीटर लांब भालाफेकला, पंचांच्या गोंधळाचा त्याच्या कामगिरीवर नक्कीच फरक जाणवला.

किशोरने पहिल्या प्रयत्नात ८१.७६ मीटर लांब भालाफेकून दुसरे स्थान पटकावले, परंतु त्याच्या दुसऱ्या प्रयत्नात गोंधळ उडालेला पाहायला मिळला. तेव्हा त्याच्यासाठी नीरज पुढे आला. नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८४.४९ मीटर लांब भालाफेकून अव्वल स्थान कायम ठेवले. पण, किशोरने त्याच्या तिसऱ्या प्रयत्नात ८६.७७ मीटर ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक भालाफेक करून अव्वल स्थानी झेप घेतली. या कामगिरीसह किशोरने पॅरीस ऑलिम्पिक २०२४ चेही तिकिट पक्के केले. नीरजने त्याच्या चौथ्या प्रयत्नात ८८.८८ मीटर लांब भाला फेक करून पुन्हा अव्वल स्थान पटकावले. किशोरने ८७.५४ मीटर लांब भालाफेकून दुसऱ्या स्थानावरील पकड मजबूत केली. 

कोण आहे किशोर जेना?ओडिशाच्या पुरी जिल्ह्यातील कोथासाही गावात जन्मलेल्या २८ वर्षीय किशोरने आज कमाल केली. त्याने ८६.७७ मीटर भालाफेक करून पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले. २०२३मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत त्याने रौप्यपदक जिंकले होते आणि त्यानंतर श्रीलंकेत झालेल्या स्पर्धेत ८४.३८ मीटर ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी नोंदवली होती. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याला ८४.७७ मीटरसह पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. 

नीरज चोप्राची कामगिरीसुवर्ण २०२० टोक्यो ऑलिम्पिक२०२३ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा२०२२ डायमंड लीग२०१८ आशियाई स्पर्धा२०१८ राष्ट्रकुल स्पर्धा२०१७ आशियाई अजिंक्यपद स्पर्धा

रौप्य २०२२ जागितक अजिंक्यपद स्पर्धा२०२३ डायमंड लीग  

 

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Neeraj Chopraनीरज चोप्रा