शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2023 : इतिहास घडला! चौघांची कमाल, भारताला ४० वर्षांनंतर जिंकून दिलं सुवर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 14:49 IST

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये भारताने तिसरे सुवर्णपदक निश्चित केलं.

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये भारताने तिसरे सुवर्णपदक निश्चित केलं. नेमबाजांनी मंगळवारी 10 मीटर एअर रायफल सांघिक गटात आणि महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर आज घोडेस्वारांनी सांघिक गटाचे सुवर्ण नावावर केले. मागील 40 वर्षांत भारताने प्रथमच या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. भारताच्या संघात अनुष अगरवाल, सुदीप्ती हजेला, हृदय विपूल छेडा आणि दिव्याकृती सिंग यांचा समावेश होता. या चौघांनी मिळून सर्वाधिक 209.205 गुणांची कमाई केली.  अनुष आणि हृदय यांनी अनुक्रमे 71.088 आणि 69.941 गुणांसह वैयक्तिक गटात अनुक्रमे रौप्यपदक व कांस्यपदकही जिंकले. 1982 मध्ये दिल्ली येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने या क्रीडा प्रकारात सांघिक गटाचे सुवर्ण जिंकले होते. 

भारताने सेलिंगमध्ये दोन पदकांची कमाई केली.  १७ वर्षीय नेहा ठाकूरने मुलींच्या Dinghy - ILCA4 प्रकारात रौप्यपदक जिंकले.  त्यानंतर इबाद अलीने ( Eabad Ali) पुरुषांच्या Windsurfer RS:X गटात कांस्यपदक जिंकले. त्याला तीन फेरींमध्ये अपयश आले होते, परंतु त्याने पुनरागमन केले अन् ५७ गुणांसह तिसरे स्थान पटकावून कांस्यपदक निश्चित केले.   

भारतीय पुरूष मेडली रिले संघाने ४ बाय १०० मीटर स्पर्धेत ३:४०.८४ सेकंदाची वेळ नोंदवून नवा राष्ट्रीय विक्रम केला. यापूर्वी २०१८मध्ये ३:४४.९४ सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम होता. आता भारतीय संघ फायनलमध्ये पदकासाठी खेळणार आहे. तलवारबाजीत भारताच्या भवानी देवीला उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या शाओ याकीकडून १५-७ अशी हार मानावी लागली. भारताचे एक पदक गेले. भवानीने आज उल्लेखनीय कामगिरी करून इथपर्यंत मजल मारली होती, परंतु तिला पदकाने हुलकावणी दिली. या सामन्यात रेफरीने तिच्या विरोधात निकाल दिल्याचा आरोप भवानीने केला. 

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Team Indiaभारतीय क्रिकेट संघ