शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2023 : १९७४ ते २०२३! तेजस्वीन शंकरने डेकॅथलॉनमध्ये भारताची ४९ वर्षांची प्रतीक्षा संपवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 20:50 IST

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये तेजस्वीन शंकरने ( Tejaswin Shankar ) पुरुषांच्या डेकॅथलॉन स्पर्धेत ७६६६ गुणांसह राष्ट्रीय विक्रमाची नोंद करून रौप्यपदक जिंकले.

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये तेजस्वीन शंकरने ( Tejaswin Shankar ) पुरुषांच्या डेकॅथलॉन स्पर्धेत ७६६६ गुणांसह राष्ट्रीय विक्रमाची नोंद करून रौप्यपदक जिंकले. याआधी त्याने १५०० मीटरच्या अंतिम फेरीत चौथे स्थान पटकावले होते. १९७४ नंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या डेकॅथलॉन स्पर्धेत भारताचे हे पहिले पदक आहे. १९७४ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत विजयसिंह चौहान याने पदक जिंकले होते.  यापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम भारतिंदर सिंगच्या नावावर ७६५८ गुणांचा होता. 

तेजस्वीनने १५०० मीटर शर्यत ४ मिनिटे ४७.५५ सेकंदात पूर्ण केली आणि त्याच्या खात्यात ६३४ गुण जमा करून रौप्यपदक निश्चित केले. त्याने जपानच्या यामू मारूयामाला मागे टाकले. चिनच्या सून क्यूहाओने ७८१६ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. तेजस्वीनने तीन क्रीडा प्रकारात सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची नोंद केली. त्याने ३९.२८ मीटर लांब थाळी फेकली, १३.३९ मीटर लांब गोळा फेकला आणि ४.१० मीटर बांबू उडी मारली. 

"माझ्या कामगिरीवर मी खूप खूश आहे. राष्ट्रीय विक्रम मोडणे हे ध्येय होते, जे मी करू शकलो. मला थोडी अधिक अपेक्षा होती पण मला त्रास होत होता, त्यामुळे ठीक आहे," असे तेजस्वीनने ऐतिहासिक पदकानंतर सांगितले. डेकॅथलॉनच्या दहा स्पर्धांमध्ये पहिल्या दिवशी तेजस्वीनने १०० मीटरमध्ये ११.१२ सेकंद वेळेसह ८३४ गुण, लांब उडीमध्ये ७.३७ मीटर अंतरासह ९०३ गुण, १३.३९ मीटर थ्रोसह ५९१ गुण, १००२ गुणांची कमाई केली. उंच उडीत आणि ४०० मीटरमध्ये ४९.६७ सेकंदांसह ८३० गुण अशा एकूण ४२६० गुणांच्या आघाडीसह दिवसाचा शेवट केला होता.   दुसऱ्या दिवशी, तेजस्वीनने ११० मीटर अडथळा शर्यतीत १४.७८  सेकंदाच्या वेळेसह ८७६ गुण, थाळी फेकीत ३९.९८ मीटरच्या नवीन वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह ६५० गुण,  बांबू उडीत ४.१० मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह ६४५ गुण, भालाफेकीत ५१.७७ मीटर लांब भालाफेकीसह ६०६ गुणांची कमाई केली. १५०० मीटरमध्ये ४:४७.५५ या वेळेसह ६२९  गुण जमा केले. त्याने ११ वर्षांपूर्वीचा राष्ट्रीय विक्रमही मोडला. 

डेकॅथलॉन मध्ये भारताला पदक जिंकून देणारे खेळाडू१९५१ - खुर्शीद अहमद ( कांस्य)१९५४ - रॉनी ओ'ब्रायन ( कांस्य)१९६२ - गुरबचन सिंग रंधावा ( सुवर्ण)१९७० - एम जी शेट्टी ( रौप्य)१९७४- विजय सिंग चौहान ( सुवर्ण)१९७४- सुरेश बाबू ( कांस्य)

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Team Indiaभारतीय क्रिकेट संघ