शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2023 : शेतकऱ्याच्या पोरीची गगन भरारी! आशियाई स्पर्धेत नेहानं जिंकलं ऐतिहासिक पदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 11:13 IST

Asian Games 2023 आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये तिसऱ्या दिवशी अखेर भारताने पदकाचे खाते उघडले.

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये तिसऱ्या दिवशी अखेर भारताने पदकाचे खाते उघडले. नेमबाजी अन् तलवारबाजीत पदकाने हुककावणी दिल्यानंतर सेलिंग या क्रीडा प्रकारात भारताने प्रथमच पदकाची कमाई केली. १७ वर्षीय नेहा ठाकूरने मुलींच्या Dinghy - ILCA4 प्रकारात रौप्यपदक जिंकले. मध्यप्रदेशमधील अमलताज गावातली नेहा ही शेतकऱ्याची पोर आहे. तिने याचवर्षी आशियाई सेलिंग अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. भारताने दोन दिवसांत २ सुवर्ण, ३ रौप्य व ६ कांस्य अशा एकूण ११ पदकांची कमाई करून तालिकेत सहावे स्थान पटकावले आहे.  यापैकी प्रत्येकी १-१ सुवर्ण हे क्रिकेट व नेमबाजीतील आहे. तर २ रौप्य व ३ कांस्य नौकानयनातील आणि १ रौप्य व ३ कांस्य हे नेमबाजीतील आहेत. आज त्यात एका पदकाची भर पडली.   

  • जलतरण - भारतीय पुरूष मेडली रिले संघाने ४ बाय १०० मीटर स्पर्धेत ३:४०.८४ सेकंदाची वेळ नोंदवून नवा राष्ट्रीय विक्रम केला. यापूर्वी २०१८मध्ये ३:४४.९४ सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम होता. 
  • तलवारबाजी - भारताच्या भवानी देवीला उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या शाओ याकीकडून १५-७ अशी हार मानावी लागली. भारताचे एक पदक गेले.  
  • नेमबाजी- दिव्यांक्ष सिंग आणि रमिता यांना मिश्र सांघिक गटाच्या कांस्यपदकाने थोडक्यात हुलकावणी दिली. भारतीय जोडी ८-० अशी आघाडीवर होती, परंतु दक्षिण कोरियाच्या हाजून पार्क व इयून्सेओ ली यांनी सामना १८-१८ असा बरोबरीत आणला अन् शूटआऊटमध्ये २०-१८ असा विजय मिळवला.  
  • स्क्वॉश - भारतीय महिला संघाने ३-० अशा फरकाने पाकिस्तानला नमवले. १७ वर्षीय अनाहत सिंगने पाकिस्तानच्या सादीया गुलवर ३-० असा विजय मिळवून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जोश्ना चिनप्पा व तन्वी खन्ना यांनी पाकिस्तानी प्रतिस्पर्धींवर सहज विजय मिळवला.  
  • हॉकी - भारतीय पुरुष संघाने आज अ गटातील दुसऱ्या सामन्यात सिंगापूरवर  १६-१ असा दणदणीत विजय मिळवला. पहिल्या सामन्यात त्यांनी उझबेकिस्तानवर १६-० असा दणदणीत विजय मिळवता होता. आज मनदीप सिंग ( १२ मि., ३० मि. व ५१ मि.) याची हॅटट्रीक अन् कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या ( २४मि. ३९ मि., ४०मि. व ४२ मि.) चार गोल्सच्या जोरावर भारताने  हा विजय मिळवला. व्हीएस प्रसाद ( २३ मि.), गुरजंत सिंग ( २२ मि.), उपाध्याय ( १६ मि.), शमशेर सिंग ( ३८ मि.), मनप्रीत सिंग ( ३७ मि.) आणि अभिषेक ( ५१ मि. ५२ मि.) यांनी दमदार खेळ केला.   
टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Team Indiaभारतीय क्रिकेट संघ