शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2023 : जिद्दीला सलाम! कोरोना काळात 'वेटर'चं काम करून आशियाई स्पर्धा गाजवणारा 'राम बाबू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 13:50 IST

सध्या चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचा रंगला असून भारतीय शिलेदारांची चमकदार कामगिरी सुरूच आहे.

सध्या चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचा रंगला असून भारतीय शिलेदारांची चमकदार कामगिरी सुरूच आहे. स्पर्धेच्या अकराव्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंनी कमाल केली. मंजू राणी आणि राम बाबू यांनी कांस्य पदक जिंकून भारताच्या पदकांची संख्या वाढवली. मंजू राणी आणि राम बाबू यांनी देशासाठी ७० वे पदक जिंकले. कांस्य पदक विजेत्या राम बाबू हिची कहाणी अनेकांसाठी प्रेरणा आहे. कधीकाळी वेटरचे काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या राम बाबूने आशियाई स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. 

दरम्यान, मंजू राणी आणि राम बाबू या जोडीने बुधवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत ३५ किमी चालण्याच्या शर्यतीत देशाला कांस्य पदक जिंकून दिले. राम बाबूने २ तास ४२ मिनिटे ११ सेकंदात शर्यत पूर्ण केली तर मंजू राणीने ३ तास ९ मिनिटे ३ सेकंदात अंतर गाठले. भारताने ५ तास ५१ मिनिटे १४ सेकंद अशी एकत्रित वेळ नोंदवत तिसरे स्थान पटकावले. सुवर्ण पदक विजेत्या चिनी संघापेक्षा भारतीय शिलेदार ३४ मिनिटे ३३ सेकंदांनी मागे राहिले. 

कोरोना काळात 'वेटर' पण...राम बाबू कोरोना काळात मनरेगा अंतर्गत मजूर म्हणून काम करायचा. माती खोदण्याचे काम करून तो पैसे कमवायचा. याआधी त्याने वाराणसीमध्ये वेटर म्हणूनही काम केले होते. वेटरच्या कामात रस वाटत नसल्याने त्याने माती खोदून आपली वाटचाल सुरू केली. मागील वर्षी राष्ट्रीय विक्रम केल्यानंतर राम बाबू म्हणाला होता, "लोक वेटर्ससोबत चांगले वागत नाहीत. ते त्यांना कमी लेखतात. लोक ज्या प्रकारे मला 'छोटू' आणि इतर नावांनी हाक मारायचे ते दिवस आठवून मला खूप वाईट वाटते. तेव्हा मी असाच विचार करायचो की, मला लवकरात लवकर यातून बाहेर पडायचे आहे."

चित्रपट पाहून सुरूवात केली अन्...क्रीडा क्षेत्राशी निगडीत चित्रपट पाहून प्रेरित होऊन बाबूने धावायला सुरुवात केली. आधी तो मॅरेथॉन करत असे पण २०१८ मध्ये गुडघ्याच्या दुखापतीमुळे राम बाबूच्या कारकिर्दीला ब्रेक लागला. पण, त्याने हार न मानता चालण्याच्या शर्यतीचा सराव सुरू केला. राम बाबूने २०२२ च्या राष्ट्रीय खेळांमध्ये राष्ट्रीय विक्रम केला होता.

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३IndiaभारतInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी