शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

Asian Games 2023 : ऑटो चालकाची मुलगी ॲन्सी सोजनचा पराक्रम; तगड्या खेळाडूंना टक्कर देत जिंकले पदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 18:20 IST

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये ॲन्सी सोजन एडाप्पिल्ली ( SOJAN EDAPPILLY Ancy) ने विक्रमी कामगिरी केली.

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये ॲन्सी सोजन एडाप्पिल्ली ( SOJAN EDAPPILLY Ancy) ने विक्रमी कामगिरी केली. महिलांच्या लांब उडीत सर्वांना शैली सिंगकडून पदकाची अपेक्षा होती, परंतु केरळच्या ॲन्सीने कमाल करून दाखवली. तिने तिसऱ्या प्रयत्नात ६.५६ मीटर लांब उडी मारून थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. शैली एकीकडे संघर्ष करताना दिसली. गतविजेत्या चीनी खेळाडू शीकी झिआँगला भारताच्या युवा खेळाडू ॲन्सीने कडवी टक्कर दिली. ॲन्सीने पाचव्या प्रयत्नात ६.६३ मीटर लांब उडी मारून रौप्यपदक निश्चित करण्याच्या दिशेने पाऊल टाकले. झिआँग ६.७३ मीटरसह अव्वल स्थानावर राहिली. 

विराट कोहली फाऊंडेशनकडून खेळणाऱ्या केरळच्या थिस्सूर येथील ॲन्सी सोजन हिच्या नावावर २१वर्षांखालील राष्ट्रीय विक्रम आहे. खेलो इंडिया युवा स्पर्धेत तिने ६.३६ मीटर लांब उडी मारून हा विक्रम केला होता आणि त्यानंतर तिची आशियाई इंडोअर अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. खेलो इंडियात तिने १०० मी. २०० मी., लांब उंडी आणि ४ बाय १०० रिले असे चार सुवर्णपदक जिंकले आहेत. २० वर्षांखालील स्पर्धेतही तिने लांब उडी व १०० मीटर स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. तिचे वडील ऑटो चालवतात आणि आई सुपरमार्केटमध्ये काम करते. 

अॅथलेटिक्समध्ये आज महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात पारुल चौधरीने रौप्य आणि प्रिती लांबाने कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकात भर घातली. पारूलने ९ मिनिटे २७.६३ सेकंदाची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ आज नोंदवली, तर प्रिती ९ मिनिटे ४३.३२ सेकंदासह तिसरी आली. प्रितीनेही सर्वोत्तम वेळेची नोंद आज केली. 

 कबड्डी - २०१० व २०१४च्या सुवर्णपदक विजेत्या भारतीय महिला कबड्डी संघाला अ गटातील पहिल्याच लढतीत चायनीस तैपेईकडून बरोबरीवर समाधानी राहावे लागले. शेवटच्या ७ सेकंदात तैपेईने अखेरच्या चढाईत गुण घेत हा सामना ३४-३४ असा बरोबरीत सोडवला.

हॉकी - भारताच्या पुरुष संघाने अ गटातील शेवटच्या साखळी सामन्यात बांगलादेशला १२-० असे नमवले. हरमनप्रीत सिंग ( ३),  मनदीप सिंग ( ३), अभिषेक ( २), रोहिदास, उपाध्याय, गुरजंत सिंग आणि एन शर्मा यांनी प्रत्येकी १ गोल केला.

टेबल टेनिस - भारताच्या सुतिर्था व अहिका मुखर्जी या बहिणींनी आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये भारताला ऐतिहासिक पदक जिंकून दिले. मुखर्जी बहिणींनी महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेतील दुहेरी विभागाचे कांस्यपदक पटकावले. 

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Team Indiaभारतीय क्रिकेट संघ