शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Asian Games 2023 : खेळाडूचा मोबाईल हरवला, कर्मचाऱ्यांनी रात्र जागून हजारो कचऱ्याच्या बॅग्समध्ये केली शोधाशोध अन्...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 12:29 IST

Asian Games 2023 :  स्टेडियममध्ये आपला मोबाईल हरवला, तर कोणीही तो शोधण्यापेक्षा सोडून देणं पसंत करेल.

Asian Games 2023 :  स्टेडियममध्ये आपला मोबाईल हरवला, तर कोणीही तो शोधण्यापेक्षा सोडून देणं पसंत करेल. विशेषत: त्या स्टेडियममध्ये आशियाई स्पर्धा २०२३ चे आयोजन होत असताना.  हाँगकाँगच्या १२ वर्षीय बुद्धिबळपटू लिऊ तियान-यी  हिचा मोबाईल स्टेडियममध्ये हरवला. शनिवारी रात्री ती आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी चीनला पोहोचली. आशियाई क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा हांगझू ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटर स्टेडियमवर पार पडला आणि लिऊ खूप उत्साहित होती. Liu Tian-Yi ने संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद लुटला पण जेव्हा तिला कळले की त्याच्याकडे मोबाईल फोन नाही तेव्हा तिला खूप वाईट वाटले. 

लिऊने नेमका मोबाईल कुठे हरवला हेही आठवण्याचा प्रयत्न केला आणि टेनिस सेंटरमध्ये फोन एका बॅगेत ठेवल्याचे शेवटी तिला आठवले. ती रिकामी पिशवी होती आणि ती आतापर्यंत कचऱ्यात गेली असेल हे तिला माहीत होते. अशा स्थितीत तिने तात्काळ फोनवर कॉल केला मात्र तोपर्यंत फोन बंद झाला होता. आता फोन मिळणे अवघडच आहे,  हे तिला समजले होते.  पण, लिऊने त्यांच्या टीम लीडरशी संपर्क साधला. पण टीम लीडरसमोर सर्वात मोठा प्रश्न होता की उद्घाटन समारंभाच्या वेळी प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असताना तुम्ही कोणाला फोन शोधायला कसा सांगाल? टीम लीडर जेफ्री एडवर्डसन यांनी लिऊला सांगितले, तू तुझ्या सामन्यावर लक्ष केंद्रित कर आणि मी काहीतरी करेन. काही वेळाने जेफ्री स्वयंसेवकांच्या टीमकडे पोहोचला आणि त्यांना संपूर्ण माहीती सांगितली. रविवारी दुपारी ३ वाजता स्वयंसेवकांना लिऊचा फोन सापडला आणि त्यांनी जेफ्रीला संपर्क साधला. लिऊ आणि जेफ्री यांचा यावर विश्वास बसला नाही.

१०,००० आसनांच्या स्टेडियममध्ये आणि असंख्य कचरा पिशव्यांमधून फोन शोधण्यासाठी स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. हजारोहून अधिक कचरा पिशव्या उघडणे आणि नंतर फोन शोधणे हे सर्वात मोठे काम होते. जेफ्री यांनी या स्वयंसेवकांचे आभार मानले. यानंतर युवा बुद्धिबळपटूने एक व्हिडिओ बनवला आणि सर्व स्वयंसेवकांचे आभार मानले आणि सांगितले की, तुमच्या मेहनतीमुळे मला येथे घरासारखे वाटते. 

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३chinaचीन