शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2023 : स्वप्ना बर्मनचे भारतीय नंदिनीवर आरोप, 'ती ट्रान्सजेंडर आहे, मला पदक परत द्या नाहीतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 14:02 IST

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये भारतीय खेळाडूंनी मैदान गाजवले आहे. मात्र, भारताच्या खेळाडूविरोधात भारतीय खेळाडूच उभा राहिल्याचे चित्र दिसतेय.

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये भारतीय खेळाडूंनी मैदान गाजवले आहे. मात्र, भारताच्या खेळाडूविरोधात भारतीय खेळाडूच उभा राहिल्याचे चित्र दिसतेय. हेप्टॅथलॉनमध्ये कांस्यपदक जिंकणारी नंदिनी आगासरा ( Nandini Agasara) हि ट्रान्सजेंडर असून ती या खेळासाठी अपात्र असल्याचा आरोप २०१८च्या आशियाई स्पर्धेत हेप्टॅथलॉनमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारताच्याच स्वप्ना बर्मन ( Swapna Barman ) हिने सोमवारी सकाळी केला. ''जे पदक मला मिळायला हवे होते ते नंदिनीला मिळाले आहे.हे पदक परत न मिळाल्यास सर्वांचा पर्दाफाश करेन,'' अशी धमकी स्वप्नाने दिली.  

स्वप्ना पुढे म्हणाली, "ज्या ट्रान्सजेंडर अॅथलीट्सचे टेस्टोस्टेरॉन लेव्हल २.५ पेक्षा जास्त आहे ते २०० मीटरपेक्षा जास्त लांबच्या इव्हेंटमध्ये भाग घेऊ शकत नाहीत. हेप्टाथलॉनमध्ये एवढ्या वेगाने कोणतीही मुलगी धावू शकत नाही. मी १३ वर्षे यात प्रशिक्षण घेतले. अवघ्या ४ महिन्यांच्या प्रशिक्षणाने ही पातळी गाठणे अशक्य आहे.'' यावर्षी ३१ मार्चपासून लागू झालेल्या जागतिक अॅथलेटिक्सच्या ताज्या नियमांनुसार, जे खेळाडू पुरुष यौवनावस्थेतून जात आहेत, त्यांना महिलांच्या स्पर्धेत सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे.   बर्मन पुढे म्हणाली की, आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी आंतरराज्य स्पर्धेत तेलंगणाच्या खेळाडूने ५७०० गुण मिळवले होते तेव्हाही मी नंदिनीबद्दल तक्रार केली होती. मी यापूर्वी देखील त्याच्या विरोधात निषेध केला होता, आशियाई क्रीडा स्पर्धेच्या यादीत तिचे नाव पाहून मला आश्चर्य वाटले. फेडरेशनचे अधिकारी मला पुन्हा विरोध करण्यास सांगत आहेत, ते म्हणतात की ते डॉक्टर नाहीत, फक्त तेच पडताळणी करू शकतात. मला NADA-WADA मध्ये जाण्यास सांगत आहे.अशा परिस्थितीत मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करतो की या विरोधात आवाज उठवा आणि मला मदत करा.

''मी नंदिनीबद्दल तक्रार करताच ती आशियाई क्रीडा स्पर्धेच्या गावातून पळून गेली. ६ ऑक्टोबरला आम्ही हँगझोहून निघणार होतो. माझी आई आजारी असल्याचे सांगून माझ्या तक्रारीनंतर ती पळून गेली, कारण तिची चाचणी होणार होती. तिला इथे आणण्यात कोणाचा हात आहे, हा माझा प्रश्न आहे,''असेही स्वप्ना म्हणाली.  

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Team Indiaभारतीय क्रिकेट संघ