शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: सुवर्णपदक जिंकले, आता शर्यत 'खेल रत्न' पुरस्कारासाठी; बजरंग, विनेश आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 15:45 IST

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेत बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी भारताला कुस्तीतील सुवर्णपदक जिंकून दिले आणि देशातील सर्वोच्च राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठीच्या शर्यतीला सुरुवात झाली आहे.

मुंबई - आशियाई स्पर्धेत बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी भारताला कुस्तीतील सुवर्णपदक जिंकून दिले आणि देशातील सर्वोच्च राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठीच्या शर्यतीला सुरुवात झाली आहे. दोन्ही कुस्तीपटूंनी रोमहर्षक विजय मिळवताना ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. आशियाई स्पर्धेपूर्वी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही दोघांनी आपापल्या गटात सुवर्णपदकाची कमाई केली होती.

वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार बजरंगने खेल रत्न पुरस्कारासाठी अर्ज दाखल केला आहे, तर विनेशही लवकरच अर्ज करणार आहे. भारतीय कुस्ती महासंघातर्फे बजरंगने पुरस्कारासाठी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा 29 ऑगस्ट म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिनी पार पडतो, परंतु आशियाई स्पर्धेमुळे हा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. 

''फेडरेशनतर्फे बजरंगने खेल रत्न पुरस्कारासाठी अर्ज दाखल केला आहे आणि राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेतील कामगिरीनंतर त्याला तो मिळायलाच हवा. विनेश या अर्ज करणार आहे की नाही, याबाबत माहिती नाही. परंतु मंत्रालयाकडून तिच्या नावाचा विचार केला जाईल," अशी माहिती महासंघाच्या पदाधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला दिली.  ते पुढे म्हणाले,"बजरंग आणि विनेश दोघेही या पुरस्काराचे प्रबळ दावेदार आहेत."

बजरंगने 65 किलो वजनी गटात जपानच्या ताकातानी दैचीचा 11-8 असा पराभव केला. महिलांच्या 50 किलो वजनी गटात विनेशने जपानच्याच ईरीक युकीचा 6-2 असा पराभव केला. आशियाई स्पर्धेतील भारतीय महिला कुस्तीपटूने जिंकलेले हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. 

हरयाणाच्या या दोन कुस्तीपटूंप्रमाणे भालाफेकपटू नीरज चोप्राही खेल रत्न पुरस्काराच्या शर्यतीत आहे. आशियाई स्पर्धेत ध्वजधारक असलेल्या नीरजनेही नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवताना भारताला भालाफेकीतील पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. मिल्खा सिंग ( 1958) यांच्यानंतर आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला.  25 सप्टेंबरला राष्ट्रपती भवनात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाNeeraj Chopraनीरज चोप्राWrestlingकुस्ती