शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: साधी माणसं जेव्हा जग जिंकतात, स्वप्नाच्या आईचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 09:54 IST

कोलकाता - आशियाई स्पर्धेत देशाला सुवर्णपदक जिंकवून देणाऱ्या स्वप्ना बर्मनच्या आईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत स्वप्नाच्या विजयाचा क्षण टिपण्यात आला आहे. मात्र, स्वप्नाने सोनेरी झेप घेतल्यानंतर जकार्तामध्ये तिरंगा फडकविताना तिच्या कुटुंबीयांचा आनंद या व्हिडिओत टिपला आहे. स्वप्नाने तिंरगाच उंचावताच तिच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले आहेत.पश्चिम ...

कोलकाता - आशियाई स्पर्धेत देशाला सुवर्णपदक जिंकवून देणाऱ्या स्वप्ना बर्मनच्या आईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत स्वप्नाच्या विजयाचा क्षण टिपण्यात आला आहे. मात्र, स्वप्नाने सोनेरी झेप घेतल्यानंतर जकार्तामध्ये तिरंगा फडकविताना तिच्या कुटुंबीयांचा आनंद या व्हिडिओत टिपला आहे. स्वप्नाने तिंरगाच उंचावताच तिच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले आहेत.

पश्चिम बंगाच्या जैलपुरी येथील एका रिक्षावाल्याची मुलगी असलेल्या स्वप्नाने आपल्या अलौकिक कामगिरीच्या जोरावर जग जिंकले आहे. ज्या खेळाची साधी कल्पनाही कोट्यवधी भारतीयांना नव्हती. त्या हेप्टॉथ्लॉन स्पर्धेत स्वप्ना बर्मनने सुवर्णपदक जिंकले. कोट्यवधी भारतीयांना यावेळी आनंद झाला होता. पण, स्वप्नाच्या कुटुंबीयांसाठी हा सोनेरी क्षण एका स्वप्नासारखाच होता. त्यामुळे या आशियाई विजयाचे सेलिब्रेशन करताना स्वप्नाच्या आईने चक्क टाहो फोडला. तर अंथरुणात खिळेलेल्या तिच्या रिक्षावाल्या वडिलांनाही अश्रू अनावर झाले. स्वप्नाचे हे यश पत्र्याच्या घरात एका फोर्टेबल रंगीत टीव्हीवर पाहणाऱ्या तिच्या कुटुंबीयांसाठी एक सुखद धक्का होता. त्यामुळेच, तिच्या आईने चक्क टाहो फोडत घरातील देव्हाऱ्यावर लोटांगण घेतल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. सर्वसाधारण माणसे जेव्हा जग जिंकताता, तेव्हा तो आनंद गगनातही मावत नाही, याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वप्नाच्या कुटुंबीयांचा व्हायरल होणार हा व्हिडीओ आहे. स्वप्नाच्या हा विजयाचा क्षण स्वप्नासाठी, तिच्या कुटुंबीयांसाठी आणि देशवासियांसाठी एक भावूक क्षण होता. 

पाहा व्हिडिओ - 

 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाGold medalसुवर्ण पदक