शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: राहीसाठी ही विक्रमी कामगिरी महत्त्वाची - पवन सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 05:54 IST

महाराष्ट्राची अव्वल नेमबाज राही सरनोबतसाठी आशियाई स्पर्धेतील विक्रमी सुवर्ण अत्यंत महत्त्वाचे आहे.

पुणे : महाराष्ट्राची अव्वल नेमबाज राही सरनोबतसाठी आशियाई स्पर्धेतील विक्रमी सुवर्ण अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे राहीचा आत्मविश्वास वाढणार असून, तो तिला आगामी काळात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद आणि जागतिक स्पर्धेसाठी उपयोगात येणार असल्याचे मत ‘रायफल असोसिएशन आॅफ इंडिया’चे सह सरचिटणीस जनरल पवन सिंग यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.पवन म्हणाले की, ‘राहीने ज्या २५ मीटर पिस्टल प्रकारात सुवर्ण जिंकले आहे, अशी कामगिरी आतापर्यंत कोणत्याही महिला नेमबाजपटूने आशियाई क्रीडा स्पर्धेत केलेली नाही. आज राहीने जी कामगिरी केली तिला तोड नाही. गेले दोन वर्षे राही दुखापतीवर उपचार घेत होती. जर्मनीच्या मुंबीयार या महिला मार्गदर्शकांकडे ती सराव करीत असून, त्यांनी तिच्या दुखापतीवर योग्य प्रकारे उपचार घेण्यासाठी तिला खूप साहाय्य केले आहे.राहीचा आत्मविश्वास आणि तिची एकाग्रता यासाठी त्यांनी तिच्याकडून योग्य ते व्यायाम प्रकार आणि योगसाधना करून घेतली आहे.’ राहीच्या पुढील स्पर्धांविषयी पवन म्हणाले, ‘आगामी काळात कोरिया येथे होणाºया जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी आणि नवी दिल्ली येथे फेब्रुवारी २०१९मध्ये प्रथमच होणाºया जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी हे सुवर्णपदक राहीसाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण त्या आॅलिम्पिक कोटा स्पर्धा असतील. राहीने आज ५८० गुणांची कामगिरी केली आहे आणि आयएसएसएफच्या आतापर्यंतच्या पात्रता आलेखानुसार राहीच्या शूटिंग प्रकारासाठी अंदाजे ५८४ ते ८५५ गुणांची पात्रता असते. राही या वाढलेल्या आत्मविश्वासाने ही पात्रता नक्कीच गाठू शकणार आहे. तिच्या प्रकारात प्रिसिजन शूटिंग आणि रॅपिड फायर (ड्युलिंग) असे मिळून गुण ग्राह्य धरले जातात.

टॅग्स :Rahi Sarnobatराही सरनोबतAsian Games 2018आशियाई स्पर्धा