शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018 Medal Tally: आतापर्यंत कुणी पटकावली किती पदके, तुम्हाला माहिती आहे का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 20:12 IST

Asian Games 2018 Medal Tally: भारताने आज या स्पर्धेतील पदकांचे अर्धशतक पूर्ण केले, तर दुसरीकडे चीनने मात्र पदकांचे द्विशतक पूर्ण केले आहे. चीन हा अजूनही 205 पदकांसह अव्वल क्रमाकावर कायम आहे.

ठळक मुद्देभारताने आतापर्यंत 9 सुवर्णपदके पटकावली आहेत, त्याचबरोबर 19 रौप्य आणि 22 कांस्यपदके भारताच्या खात्यामध्ये आहेत.

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : इंडोनेशियामध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा ज्वर चांगलाच चढला आहे. आजचा दिवस आशियाई खेळासाठी अविस्मरणीय असाच आहे. कारण भारताने आज या स्पर्धेतील पदकांचे अर्धशतक पूर्ण केले, तर दुसरीकडे चीनने मात्र पदकांचे द्विशतक पूर्ण केले आहे. चीन हा अजूनही 205 पदकांसह अव्वल क्रमाकावर कायम आहे.

चीनची या स्पर्धेतील कामगिरी नेत्रदीपक अशीच आहे. कारण सुवर्णपदकांचे शतक पूर्ण करण्यासाठी त्यांना फक्त चार पदकांची गरज आहे. चीनने आतापर्यंत 96 सुवर्ण, 64 रौप्य आणि 45 कांस्य अशी एकूण 205 पदके आहेत. पदकतालिकेत दुसरे स्थान जपानने कायम ठेवले आहे. जपानच्या खात्यामध्ये 43 सुवर्ण, 38 रौप्य, 60 कांस्य अशी एकूण 141 पदके आहेत. पदकतालिकेत तिसरा क्रमांक दक्षिण कोरियाने पटकावला आहे. कोरियाने आतापर्यंत     32 सुवर्ण, 39    रौप्य आणि 46    कांस्य अशी एकूण 117 पदके पटकावली आहेत.

भारताने आज आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकांचे अर्धशतक पूर्ण केले. भारताचे हे पन्नासावे शतक मिश्र रिले स्पर्धेत मिळाले. 4 बाय 400 मी. मिश्र रिले प्रकारात भारताच्या हिमा दास, पुवम्मा राजू, मोहम्मद अनास आणि अरोकिवाराजीव यांनी भारताला रौप्यपदक मिळवून दिले.

 कुराश या खेळप्रकारात भारताने दोन पदके पटकावली आहेत. या खेळातील 52 किलो वजनीगटामध्ये भारताच्या पिंकी बलहाराने रौप्य, तर मालाप्रभा यलप्पा जाधवने कांस्यपदक पटकावले आहे.

 

भारताला 800 मी. धावण्याच्या स्पर्धेत भारताच्या मनजित सिंगने सुवर्णपदक जिंकवून दिले. भारतासाठी अजून एक आनंदाची बाब म्हणजे या स्पर्धेतील रौप्यपदकही आपल्याला मिळाले आहे. भारताच्या जिन्सन जॉन्सनने या स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे.

भारताच्या खात्यामध्ये एकूण 50 पदके आहेत. या 50 पदकांसह भारताने आठवे स्थान पटकावले आहे. भारताने आतापर्यंत 9 सुवर्णपदके पटकावली आहेत, त्याचबरोबर 19 रौप्य आणि 22 कांस्यपदके भारताच्या खात्यामध्ये आहेत.

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाBadmintonBadmintonManjeet Singhमनजित सिंगPV Sindhuपी. व्ही. सिंधू