शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: आठव्या दिवशी भारताची चांदीच, पण 'सुवर्ण'पासून लांबच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 22:01 IST

आशियाई स्पर्धेत महिला एकेरीत पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय खेळाडूचा मान सायना नेहवालला.

जकार्ता- आशियाई स्पर्धेत महिला एकेरीत पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय खेळाडूचा मान सायना नेहवालला. रविवारी तिने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत थायलंडच्या इंतानोन रॅटचानोकचा 21-18, 21-16 असा पराभव केला. उपांत्य फेरीतील प्रवेशाने तिने कांस्यपदक निश्चित झाले आहे. यापूर्वी सय्यद मोदी यांनी 1982 मध्ये पुरुष एकेरीतील कांस्यपदक नावावर केले होते. पी. व्ही. सिंधूनेही उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताच्या द्युती चंदला १०० मीटर शर्यतीत रौप्यपदक. ११.३२ सेकंदाची नोंदवली वेळ# Breaking News : भारताच्या गोविंदन लक्ष्मणननचे कांस्यपदक काढून घेतले. पुरुषांच्या 10000 मीटर शर्यतीत धावताना त्याचा पाच रेषेबाहेर पडल्याने त्याला अपात्र ठरवण्यात आले.

#Athletics पुरुषांच्या 10000 मीटर शर्यतीत गोविंदन लक्ष्मणन याने 29 मिनिटे 44.91 सेकंदाच्या वेळेसह कांस्यपदक जिंकले. 

 

#Bridge भारतीय संघाने ब्रीज स्पर्धेत ( पत्त्यांचा खेळ) दोन कांस्यपदक निश्चित केली. भारताला मिश्र व पुरुष सांघिक गटात उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला.

#Athletic भारताच्या द्युती चंदने महिलांच्या 100 मीटर शर्यतीच्या उपांत्य फेरीत 11.43सेकंदाची वेळ नोंदवली. तिने या कामगिरीसह अंतिम फेरीत स्थान निश्चित केले.

#Archery भारताच्या पुरुष तिरंदाजांनी कम्पाऊंड गटाच्या सांघिक गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांनी चायनीज तैपेईचे आव्हान 230-227 असे मोडून काढले. रजत चौहान, अमन सैनी आणि अभिषेक वर्मा यांचा भारतीय संघात समावेश आहे. 

#Boxing महिलांच्या 51 किलो वजनी गटात भारताच्या सर्जुबाला देवीने 5-0 अशा फरकाने तजाकिस्तानच्या घाफोरोव्हा मदिनाचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 

#Badminton पी. व्ही. सिंधूची उपांत्य फेरीत धडक. थायलंडच्या जिंदपोल निटचाओनचा 21-11, 16-21, 21-14 असा चुरशीच्या लढतीत पराभव केला. उपांत्य फेरीतील प्रवेशाने महिला एकेरीतील आणखी एक पदक निश्चित. 

#Boxing भारताच्या मनोज कुमारला 69 किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या अब्दुराखमानोव्हकडून 5-0 असा पराभव पत्करावा लागला.

 

#Archery भारताच्या महिला तिरंदाजांनी कम्पाऊंड सांघिक गटाच्या उपांत्य फेरीत चायनीज तैपेईच्या खेळाडूंना कडवी टक्कर दिली. ज्योती सुरेखा, मुस्कान किरार आणि मधुमिता कुमारी यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने 225-222 अशा फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. सुवर्णपदकाच्या लढतीत त्यांच्यासमोर दक्षिण कोरियाचे आव्हान असणार आहे.  

#Badminton रविवारी तिने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत थायलंडच्या इंतानोन रॅटचानोकचा 21-18, 21-16 असा पराभव केला. उपांत्य फेरीतील प्रवेशाने तिने कांस्यपदक निश्चित झाले आहे. यापूर्वी सय्यद मोदी यांनी 1982 मध्ये पुरुष एकेरीतील कांस्यपदक नावावर केले होते.

 

आशियाई स्पर्धेत भारताच्या खात्यात घोडेस्वार फौआद मिर्झाने रौप्यपदक जिंकून दिले. त्याने 26.40 गुणांची कमाई करताना ही विक्रमी कामगिरी केली. 1982नंतर घोडेस्वाराने पटकावलेले हे पहिलेच पदक ठरले. सांघिक गटातही भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय संघाने 121.30 गुण मिळवले. जपान व थायलंड यांनी अनुक्रमे सुवर्ण व कांस्यपदक जिंकले. 

 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा