शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Asian Games 2018 : हीना, राही, मनू यांच्याकडून सुवर्णाची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 05:09 IST

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ खूप ताकदवान दिसत आहे. सर्व नेमबाज उत्तम कामगिरी करून पात्र ठरले आहेत, ते निश्चितच उत्तम कामगिरी करतील.

- अंजली भागवतआशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ खूप ताकदवान दिसत आहे. सर्व नेमबाज उत्तम कामगिरी करून पात्र ठरले आहेत, ते निश्चितच उत्तम कामगिरी करतील. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपेक्षा आशियाई स्पर्धा खूप कठीण असणार आहे. कारण, आॅलिम्पिकमधील बहुतांश पदकविजेते आशियातूनच आहेत. पदकं जिंकण्याबद्दल बोलायचं झालं तर, ते त्या दिवसावर व परिस्थितीवर अवलंबून असणार. काहीवेळा दुर्दैवाने अत्यंत कमी मार्जिनद्वारे शॉट चुकू शकतो आणि पदकसुद्धा निसटते. मिश्र संघ नेमबाजी प्रकार उत्साहवर्धक वातावरण आहे आणि भारतीय नेमबाजांनी तिथे पदक जिंकण्याची चांगली संभावना आहे. भारतीय महिला नेमबाज हीना सिध्दू, मनू भाकर, श्रेयशी सिंग, अपूर्वी चंदेला यांच्याकडून उत्तम कामगिरी पाहण्यास नक्कीच मिळेल. राही सरनोबतसुद्धा पुनरागमन करीत आहे आणि पदक जिंकण्यात सक्षम आहे. तरुण नेमबाजांनी मुक्त मनाने व कुठलेही दडपण न घेता लक्ष साधावे लागणार आहे तरच यश नक्कीच मिळेल असा विश्वास वाटतो.गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतीय नेमबाजांनी केलेल्या अविश्वसनीय कामगिरीनंतर, आता सर्व लक्ष आशियाई क्रीडा स्पर्धांकडे लागले आहे. भारतीय नेमबाज आपला ठसा उमटवीत असले, तरीही आशियाई क्रीडामध्ये आव्हान कठीण असणार आहे. चीनने नेमबाजीमध्ये १९७ सुवर्णपदकांसह एकूण ३९५ पदकं जिंकली आहेत. दक्षिण कोरिया २४३ पदकांसह दुसऱ्या, तर जपान १५१ पदकांसह तिसºया स्थानावर आहे. भारतीय नेमबाजांनी गत आशियाई स्पर्धेपर्यंत केवळ ७ सुवर्णपदके जिंकली आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धा किती खडतर आहे, हे भारताच्या पदक संख्येवरून कळून येते. भारताची ताकद असलेले शूटिंगचे टीम इव्हेंट दुर्दैवाने या आशियाई स्पर्धेतून वगळण्यात आले आहे. या वेळी फक्त २० आहेत. मिश्र संघांचे १० मीटर एअर रायफल, १० मीटर एअर पिस्तूल आणि ट्रॅप अशा तीन स्पर्धा ऐतिहासिक ठरणार आहेत. एकाच देशाकडून केवळ दोन नेमबाज प्रत्येक इव्हेंटमध्ये सहभागी होऊ शकतात, त्यामुळे भारतीय नेमबाजांची निवड खूप अवघड होती.अनुभवी नेमबाजांकडून पदकांची अपेक्षातीन आशियाई क्रीडा पदक जिंकणारा संजीव राजपूत आपल्या चौथ्या पदकासाठी उत्सुक दिसत आहे. ३७ वर्षीय संजीव आपल्या चौथ्या आशियाई क्रीडामध्ये आवडता ५० मीटर रायफल थ्री पोझीशनमध्ये स्पर्धा करेल. १० मीटर एअर रायफल स्पर्धा भारतासाठी खूप प्रतिष्ठितची आहे. बिंद्राने निवृत्ती घेतल्यामुळे आणि नारंगच्या अनुपस्थितीमुळे रवी कुमार आणि दीपक कुमार यांना उत्तम संधी लाभली आहे. ४२ वर्षांचा मानवजीत सिंग संधूही ट्रॅप स्पर्धेत या वेळीसुद्धा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. ही त्याची सहावी आशियाई स्पर्धा असणार आहे, या अनुभवी खेळाडूने आशियाई क्रीडा स्पर्धेत ५ पदके जिंकली आहेत आणि कदाचित आपल्या अनुभवाच्या जोरावर सहावे पदक जिंकेल.तरुण क्रांतीगेले ते दिवस जेव्हा खेळाडूंना वयाच्या विसाव्या वर्षांनंतरच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करता येईल. आपले तरुण खेळाडू निर्भय, झटपट प्रतिक्षेप आणि आपल्या खेळाच्या बाबतीत खूप एकाग्र आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचा दबाव नाही, ते आपल्या खेळाचा आनंद घेतात आणि म्हणूनच पदके जिंकतात. बºयाच  तरुण खेळाडूंसाठी ही पहिली आशियाई स्पर्धा असेल. पदकांची अपेक्षा करणे कदाचित चुकीचे; परंतु दबाव नसल्यामुळे ते उत्तम कामगिरी दर्शवतील. १५ वर्षांचा अनीश भानवाला, २०१८ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये २५ मीटर रॅपीड फायर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळविणारा सर्वांत तरुण खेळाडू ठरला. तो आशियाई स्पर्धेतसुद्धा उत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. वर्ल्ड कप आणि २०१८ कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण जिंकणारी मनू भाकरकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. एल्व्हिनिल व्हॅलेरिव्हन हीदेखील पहिल्यांदाच सीनियर गटामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळत आहे, तरीसुद्धा तिच्याकडे पदकाच्या अपेक्षेने बघितले जात आहे.(शब्दांकन : अभिजित देशमुख

टॅग्स :ShootingगोळीबारAsian Games 2018एशियन गेम्स २०१८