शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: राष्ट्रकुल स्पर्धेची पुनरावृत्ती जकार्तामध्ये करणार, सुशील कुमारचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 16:11 IST

Asian Games 2018: सुशील कुमारने दोन ऑलिम्पिक पदकं, तीन राष्ट्रकुल सुवर्णपदकं जिंकून जागतिक कुस्तीमध्ये आपली छाप सोडली आहे. तरीही आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्ण अजूनही त्याच्या गळ्यात पडलेले नाही.

-अभिजीत देशमुख(थेट जकार्ता येथून)सुशील कुमारने दोन ऑलिम्पिक पदकं, तीन राष्ट्रकुल सुवर्णपदकं जिंकून जागतिक कुस्तीमध्ये आपली छाप सोडली आहे. तरीही आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्ण अजूनही त्याच्या गळ्यात पडलेले नाही. २००६च्या कतार आशियाई स्पर्धेत सुशीलने कांस्य पदक जिंकले होते. त्यानंतर मात्र आशियाई क्रीडा स्पर्धेत तो खेळलाच नाही. जकार्ता मध्ये सुशील सुवर्णपदक जिंकेल का याची उत्सुकता लागली आहे. 

'एप्रिलमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत मी सुवर्णपदक पटकावले आणि मी सध्या फॉर्म मध्ये आहे. जकार्तामध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरीची पुनरावृत्ती करून सुवर्णपदक नक्की जिंकेन. मागील दोन आशियाई स्पर्धेत मी खेळू शकलो नाही आणि या स्पर्धेची मी खूप प्रतीक्षा केली आहे. मी कुठल्याही प्रतिस्पर्धी कमी लेखत नाही. मॅटवर गेल्यावर त्याला किती लवकर चीतपट करता येईल हाच विचार करत असतो,'असे सुशीलने सांगितले. 

( Asian Games 2018: एक सामना जिंकल्यास भारताचं बॅडमिंटनमधील पदक नक्की! )

बीजिंग आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने 66 किलो गटात अनुक्रमे कांस्य व रौप्यपदक जिंकले आहे आणि जकार्तामध्ये  तो 74 किलो किलो वजनी गटात स्पर्धा करणार आहे. 'समीक्षकांनी काय बोलले आहे याची मला चिंता नाही. माझे लक्ष केंद्रित आहे आणि त्यांना प्रदर्शनाने उत्तर देईन. मी चाहत्यांचा आभारी आहे. मला नकारात्मकता आवडत नाही.  मी नेहमीच आत्मविश्वास बाळगतो आणि त्याने मला सकारात्मक ऊर्जा मिळते. माझे कोच आणि सहकारी सकारात्मकतेवर विश्वास  ठेवतात, त्याचा मला खूप मदत झाली,'असेही तो म्हणाला. 

( Asian Games 2018: सुवर्णपरंपरा कायम राखण्यासाठी भारतीय कबड्डीपटू सज्ज!

तो म्हणाला,'कुस्ती ताकद आणि चपळतेचा खेळ आहे. मी शिस्तबद्ध जीवन जगतो. यावेळी कुस्तीमध्ये भारताला कमीत कमी ३ सुवर्णपदक मिळतील.आशिया खंडात भारताचा दबदबा वाढत आहे, पुरुष प्रमाणेच महिलासुद्धा चांगल्या खेळत आहेत. सर्व मल्ल देशाचा गौरव वाढविण्यासाठी सज्ज आहेत, मी बजरंग पुनियाकडून सुद्धा सुवर्णपदकाची अपेक्षा करत आहे. प्रतिद्वंदीबद्दल विचाराल तर जपान व इराणचे मल्ल बलाढ्य आहेत.'

टॅग्स :Asian Games 2018आशियाई स्पर्धाSushil Kumarसुशील कुमारSportsक्रीडा