Asian Games 2018: एक सामना जिंकल्यास भारताचं बॅडमिंटनमधील पदक नक्की!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 03:14 PM2018-08-18T15:14:27+5:302018-08-18T15:27:38+5:30

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अवघ्या काही तासांवर आला आहे, त्यापूर्वीच भारतीय महिला बॅडमिंटन संघासाठी आनंदाची बातमी आली आहे.

Asian Games 2018: India need one win for badminton medal | Asian Games 2018: एक सामना जिंकल्यास भारताचं बॅडमिंटनमधील पदक नक्की!

Asian Games 2018: एक सामना जिंकल्यास भारताचं बॅडमिंटनमधील पदक नक्की!

Next

मुंबई - आशियाई स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अवघ्या काही तासांवर आला आहे, त्यापूर्वीच भारतीय महिला बॅडमिंटन संघासाठी आनंदाची बातमी आली आहे. शनिवारी बॅडमिंटन स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आणि भारतीय महिला संघाला पहिल्या फेरीत 'बाय' (पुढे चाल) मिळाली आहे. पुरूष संघाला पहिल्या फेरीत मालदिवचा सामना करावा लागणार आहे. 

( Asian Games 2018: सुवर्णपरंपरा कायम राखण्यासाठी भारतीय कबड्डीपटू सज्ज!

मागील काही वर्षांत भारताच्या बॅडमिंटनपटूंनी विविध आंतरराष्ट्रीय, जागतिक स्पर्धेत वर्चस्व गाजवले आहे. त्यात सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, किदम्बी श्रीकांत, अजय जयराम, एच एस प्रणॉय यांचे प्रामुख्याने नाव घ्यायला हवे.  राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीयांनी 26 सुवर्ण, 20 रौप्य आणि 20 कांस्य अशा एकूण 66 पदकांची कमाई केली होती. यात बॅडमिंटनचा वाटा 6 पदकांचा ( 2 सुवर्ण, 3 रौप्य व 1 कांस्य) होता. त्यात विशेष म्हणजे पाच खेळाडूंनी सुवर्णपदकाच्या शर्यतीपर्यंत मजल मारली. त्यामुळे आशियाई स्पर्धेतही भारतीयांकडून अपेक्षा उंचावल्या आहेत.

पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाल्याने भारतीय महिला संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे त्यांना पदक निश्चित करण्यासाठी केवळ एक सामना जिंकावा लागणार आहे. पण, हा सामना जिंकण्यासाठी त्यांना बलाढ्य जपानचा सामना करावा लागणार आहे. 2014मध्ये भारत आणि जपान महिला संघांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत उभय संघ समोरासमोर येतील ते 2014च्या कामगिरीपेक्षा चांगली कामगिरी करण्याच्या निर्धारानेच. 


( Asian Game 2018: टेबल टेनिसपटूंसाठी हीच सुवर्ण संधी! )

भारतीय पुरूष संघाला सलामीच्या लढतीत मालदिवचा सामना करावा लागेल आणि ही लढत जिंकल्यात उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा मुकाबला इंडोनेशियाशी होईल. 

Web Title: Asian Games 2018: India need one win for badminton medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.