मुंबई - विश्वविजेत्या मीराबाई चानूने आगामी आशियाई स्पर्धेतून माघार घेतली आहे. तिने तशी विनंती भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाकडे केली आहे. मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा यांनी मीराबाईच्या फिटनेसविषयी चिंता व्यक्त केली होती. तिने जकार्ता स्पर्धेतून माघार घ्यावी आणि नोव्हेंबरमध्ये आयोजित ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. मीराबाईच्या पाठीच्या खालच्या भागात मे महिन्यात दुखणे उमळले होते. ही समस्या कायम असून वजन उचलण्याचा सराव करताना त्रास होत आहे. मागच्या आठवड्यात दुखणे बरे वाटू लागताच मीराबाईने मुंबईत सरावाला सुरूवात केली होती. मात्र कालपासून पुन्हा दुखण्याने उचल खाल्ली.
Asian Game 2018: राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या मीराबाई चानूची माघार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 10:58 IST