शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

 Asian Game 2018 : भारताच्या कबड्डी संघात राज्याचे चारच शिलेदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 16:52 IST

पुढील माहिन्यात सुरू होणा-या आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या पुरूष व महिला कबड्डी संघांची घोषणा करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे या संघात उत्तरेतील राज्यांचे वर्चस्व जाणवत आहे.

मुंबई - पुढील माहिन्यात सुरू होणा-या आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या पुरूष व महिला कबड्डी संघांची घोषणा करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे या संघात उत्तरेतील राज्यांचे वर्चस्व जाणवत आहे. गेल्या काही वर्षांपासून या मराठमोळ्या खेळातून महाराष्ट्राची पिछेहाट झालेली आहे आणि त्याची प्रचिती पुन्हा एकदा आली. आशियाई स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघांत महाराष्ट्राच्या चारच खेळाडूंना संधी मिळाली आहे, परंतु त्यापैकी एक खेळाडू भारतीय रेल्वेचे प्रतिनिधीत्व करते. महाराष्ट्राच्या गिरीश इरनाक, रिशांक देवाडीगा यांची  पुरुष, तर सायली केरीपाळेची भारतीय महिला संघात निवड . त्याच बरोबर रेल्वेकडून खेळणारी महाराष्ट्राची सोनाली शिंगटेचा देखील महिला संघात समावेश.  गिरीश व रिशांक या  दोन शिलेदारांची पुन्हा एकदा भारतीय कबड्डी संघात निवड करण्यात आली आहे. जकार्ता (इंडोनेशिया) येथे  १८ऑगष्ट ते २सप्टेंबर २०१८ या कालावधीत या आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. यात कबड्डी स्पर्धा १९ ते २५ऑगष्ट २०१८ या कालावधीत होणार आहेत. दुबई येथे नुकत्याच झालेल्या मास्टर कबड्डी स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघातल्या सुरजित, सुरींदर नाडा,मनजीत चिल्लर यांना आशियाई स्पर्धेतून वगळण्यात आले असून तेलंगणाचा मल्लेश गंगाधरची पुरुष संघात वर्णी लागली आहे . रिशांक व  गिरीश यांना दुबईत पाकिस्तान बरोबर झालेल्या पहिल्या सामन्यात संधी मिळाली नव्हती. पण त्यानंतर मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करीत या दोघांनी आपली निवड सार्थ ठरवली. त्यामुळे भारतीय निवड समितीला त्यांच्या नावाचा विचार करण्यास भाग पाडले. असे असतील भारतीय संघपुरुष : गिरीश इरनाक (महाराष्ट्र), दीपक हुडा (राजस्थान), मोहित चिल्लर (भारतीय रेल्वे), संदीप नरवाल (हरियाणा), प्रदीप नरवाल (उत्तराखंड), गिरीश इरनाक (महाराष्ट्र), मोनू गोयत (सेनादल), अजय ठाकूर हिमाचल प्रदेश), रोहित कुमार सेनादल), राजू लाल चौधरी (राजस्थान), मल्लेश गंगाधर (तेलंगणा), राहुल चौधरी(उत्तर प्रदेश). राखीव :- अमित नांगर (दिल्ली), मनिंदर सिंग (पंजाब).महिला संघ : साक्षी कुमारी (हरियाणा), कविता, प्रियांका (दोघी हिमाचाल प्रदेश), मनजीत कौर (राजस्थान), पायल चौधरी, रितू नेगी, सोनाली शिंगटे (तिन्ही भारतीय रेल्वे), सायली केरीपाळे (महाराष्ट्र), रणदीप कौर खेरा(पंजाब), शालिनी पाठक (राजस्थान), उषाराणी नरसिंह (कर्नाटक), मधू (दिल्ली), राखीव : प्रियांका (हरियाणा),      शमा परवीन (बिहार). 

टॅग्स :Kabaddiकबड्डीIndiaभारतSportsक्रीडा