शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Asian Game 2018: दीपा कर्माकरचा 'बोल्ड' लूक, बघा ओळखू येतेय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 13:59 IST

Asian Game 2018: रिओ ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेची सिमोन बिल्स, रशियाची मारिया पासेका आणि स्वित्झर्लंडच्या ज्युलिया स्टेंग्रूबर यांनी जिम्नॅस्टिक्सच्या व्हॉल्ट प्रकारात अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची कमाई केली.

मुंबई - रिओ ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेची सिमोन बिल्स, रशियाची मारिया पासेका आणि स्वित्झर्लंडच्या ज्युलिया स्टेंग्रूबर यांनी जिम्नॅस्टिक्सच्या व्हॉल्ट प्रकारात अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची कमाई केली. पण, त्यांच्यापेक्षा प्रोदुनोव्हा प्रकाराच्या अंतिम लढतीत भारताच्या दिपा कर्माकरने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. दिपाचे कांस्यपदक थोडक्यात हुकले होते. पण, दिपाच्या त्या भरारीने संपूर्ण देशाला एक नवी ऊर्जा दिली.. नवी प्रेरणा दिली... नवा खेळ दिला... विशेष म्हणजे भारतीय मुलींसमोर तिने एक आदर्श ठेवला. दिपाच्या या यशस्वी भरारीनंतर भारतात जिम्नॅस्टिक्सचे वारे वाहू लागले.

2014च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर दिपाच्या नावाची चर्चा सूरू झाली होती. पण, तिला प्रसिद्धी मिळवून दिली ती ऑलिम्पिक स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीनंतर... शांत, लाजरी, स्वतःच्याच कोशात राहणारी दिपा स्टार बनली. पण, तिने आपले पाय जमिनीवरच ठेवले. कोणत्याही समारंभाला दिपा त्याच पूर्वीच्या साध्या वेशात आणि लाज-या स्वभावात दिसली. मात्र, दिपाने गुरूवारी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोने सर्वांना अचंबित केले आहे. 2015च्या आशियाई जिम्नॅस्टीक्स अजिंक्यपद स्पर्धेत आणखी एक कांस्यपदक जिंकणा-या दिपाला 2017 मध्ये पद्म श्री पुरस्काराने गौरविण्यात आले. दुखापतीनंतर ती बराच काळ स्पर्धेपासून दूर होती आणि तिने नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड चँलेंज स्पर्धेतील सुवर्णपदकाने कमबॅक केले. आगामी आशियाई स्पर्धेत ती पुन्हा एकदा पदक पटकावण्यासाठी सज्ज झाली आहे. या स्पर्धेला जाण्यापूर्वी तिने 'वुमन फिटनेस इंडिया' या मॅगझीनला खास मुलाखत दिली आणि त्यासाठी तिने खास फोटोशूटही केले. युवा पिढीला फिटनेसचा मंत्र तिने या मुलाखतीतून दिला आहे, परंतु लाजऱ्या दिपाचा 'बोल्ड' लूक चर्चेचा विषय ठरत आहे.

टॅग्स :Dipa Karmakarदीपा कर्माकरAsian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा