शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई तिरंदाजी: दीपिका, अंकिता यांना ऑलिम्पिकचे तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 04:23 IST

दीपिका कुमारी हिने येथे सुरू असलेल्या २१ व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेत गुरुवारी महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात सुवर्ण जिंकले.

बँकॉक : दीपिका कुमारी हिने येथे सुरू असलेल्या २१ व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेत गुरुवारी महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात सुवर्ण जिंकले. अंकिता भक्त हिने रौप्य पदकाची कमाई करीत दोघींनीही टोकियो आॅलिम्पिकचे तिकीट पक्के केले. विशेष म्हणजे स्पर्धेची अंतिम फेरी भारतीय खेळाडूंमध्येच रंगली.उपखंडातील देशांसाठी ही पात्रता फेरी होती. त्यातून तीन जागांचा कोटा निश्चित होणार होता. राष्ट्रीय तिरंदाजी महासंघावर निलंबनाची तलवार असल्याने भारतीय खेळाडू राष्ट्रीय ध्वजाविना खेळत आहेत. त्यातही अव्वल मानांकित दीपिका आणि सहावी मानांकित अंकिताने शानदार कामगिरी केली.दीपिकाने मलेशियाची नूर अफीसा अब्दुल हिला ७-२ ने मागे टाकले. याशिवाय तिने इराणची जहरा नेमातीला ६-४, स्थानिक खेळाडू नरीसारा खुनहिरानचायो ला ६-२ असे मागे टाकून, उपांत्य फेरीत धडक देत ऑलिम्पिकसाठी स्थान निश्चित केले. यानंतर व्हिएतनामची एन्गुएट डोथिएनवर एकतर्फी लढतीत ६-२ असा विजय नोंदविला.अंकिताने हाँगकाँगची लाम शुक चिग एटाचा ७-१, व्हिएतनामच्या एन्गुएन फुयोंगचा ६-० आणि कझाखस्तानच्या अनास्तासिया बानोवा हिचा ६-४ असा पराभव केला. उपांत्य फेरीत अंकिताने भूतानची कर्मावर ६-२ ने विजय मिळवला. अंतिम फेरीत मात्र ती दीपिकाकडून ०-६ अशी पराभूत झाली. भारताचा हा दुसरा ऑलिम्पिक कोटा ठरला. याआधी तरुणदीप राय, अतानु दास व प्रवीण जाधव यांनी विश्व चॅम्पियनशिपमधून कोटा मिळविलेला. या स्पर्धेत भारताने २ सुवर्ण, ३ रौप्य व ४ कांस्य मिळवले. २०२० साली बर्लिन येथे होणाऱ्या विश्वचषकातूनही कोटा मिळविण्याचा खेळाडूंचा प्रयत्न असणार आहे.  ‘आम्ही सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या शोधात होतो. वेगवान वारे वाहत असल्याने सुरुवातीला नर्व्हस होते. मी मात्र श्वास रोखून स्वत:ला सावरत होते. माझा भावी पती अतानु दास याला सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याची हमी दिली होती. ही स्पर्धा आमच्यासाठी लाभदायी ठरल्यामुळे संघात आनंदाचे वातावरण आहे.’- दीपिका कुमारी

टॅग्स :IndiaभारतOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020