आशियाड : खेळाडूंची यादी पंतप्रधान कार्यालय ठरवणार
By Admin | Updated: September 9, 2014 03:52 IST2014-09-09T03:52:03+5:302014-09-09T03:52:03+5:30
चियोन आशियाडसाठी किती भारतीय खेळाडू पाठवायचे याचा अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालय घेणार आहे.

आशियाड : खेळाडूंची यादी पंतप्रधान कार्यालय ठरवणार
नवी दिल्ली : इंचियोन आशियाडसाठी किती भारतीय खेळाडू पाठवायचे याचा अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालय घेणार आहे.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने क्रीडा मंत्रालयाकडे सोपविलेले ९३५ सदस्यांची यादी क्रीडा मंत्रालयाने मोदी यांच्या कार्यालयाला पाठवून दिली. त्यात ३७३ पुरुष आणि २८९ महिला खेळाडूंशिवाय २७३ कोच आणि अधिकार्यांचा समावेश आहे. क्रीडा मंत्रालयाला पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप कुठलेही निर्देश न मिळाल्यामुळे भारतीय प्रतिनिधी इंचोयोन पंजीकरण बैठकीतही उपस्थित होऊ शकला नाही.
क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत होणार्या आशियाडसाठी भारतीय पथकात किती खेळाडू राहावेत यावर पंतप्रधान कार्यालयाकडून निर्देश मागितले होते. आयओएने दिलेली यादी ७00 वर आणली जावी अशी शिफारस मंत्रालयातील अधिकारी आणि साईने आधीच केली. हे पथक चीनमध्ये २0१0 मध्ये पाठविण्यात आलेल्या पथकाच्या तुलनेत लहान असेल. चीनमध्ये ६२६ खेळाडू आणि २00 वर अधिकारी पाठविण्यात आले होते. साईचे महासंचालक जीजी थॉमसन यांनी पंतप्रधान कार्यालयाने क्रीडा मंत्रालयाला अद्याप कुठले निर्देश पाठविलेले नाही असे सांगितले.
थॉमसन म्हणाले,' फाईल पंतप्रधान कार्यालयात आहे. अद्याप उत्तर आलेले नाही. उद्यापर्यंत प्रतिक्षा करावी लागेल. भारतीय पथकाची घोषणा करण्यास उशिर होत असल्यामुळे इंचियोन आशियाडच्या आयोजन समितीसोबत होणार्या बैठकीसाठी भारतीय प्रतिनिधी उपस्थित राहू शकला नाही.
भारतीय प्रतिनिधी पंजीकरण बैठकीला गेल्याशिवाय भारतीय पथकाचे मान्यता पत्र वैध ठरणार ानही. शिवाय भारतीय खेळाडू क्रीडाग्राममध्ये प्रवेश करु शकणार नाहीत. आयओएने इंचियोन आयोजन समितीला विनंती करीत ही बैठक ११ सप्टेंबरला घेण्यास सांगितले आहे.(वृत्तसंस्था)