अश्विनच्या ट्विटने घेतली तामिळनाडूतील राजकारण्यांची फिरकी

By Admin | Updated: February 6, 2017 19:36 IST2017-02-06T18:56:50+5:302017-02-06T19:36:17+5:30

राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीवर क्रिकेटपटू आर. अश्विनने एक भन्नाट ट्विट टाकत तामिळनाडूमधील राजकारण्यांची

Ashwin tweeted the politics of Tamilnadu politicians | अश्विनच्या ट्विटने घेतली तामिळनाडूतील राजकारण्यांची फिरकी

अश्विनच्या ट्विटने घेतली तामिळनाडूतील राजकारण्यांची फिरकी

ऑनलाइन लोकमत 
चेन्नई, दि. 6 -  राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीवर क्रिकेटपटू आर. अश्विनने एक भन्नाट ट्विट टाकत तामिळनाडूमधील राजकारण्यांची फिरकी घेतली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी सज्ज झालेल्या एआयएडीएमकेच्या महासचिव शशिकला नटराजन यांच्यावर नाव न घेता निशाना साधताना अश्विनने तामिळनाडूतील तरुणांनो सज्ज राहा, राज्यात 234 जागांसाठी लवकरच भरती निघणार आहे, अशा आशयाचे ट्विट केले. मात्र यावरून वाद पेटण्याची चिन्हे दिसताच ही केवळ मस्करी आहे. त्याचा राजकारणाशी संबंध जोडू नका, असे ट्विट करत अश्विनने वाद होणार नाही याची खबरदारी घेतली.  
 तामिळनाडूमध्ये उद्या शशिकला नटराजन ह्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अश्विनचे ट्विट आल्याने त्या ट्विटची राज्यात चर्चा सुरू आहे.  "तामिळनाडूतील तरुणांनो सज्ज राहा, राज्यात 234 जागांसाठी लवकरच भरती निघणार आहे," हे ट्विट अश्विनने तामिळनाडू विधानसभेतील 234 जागा नजरेसमोर ठेवून  केले होते.  

Web Title: Ashwin tweeted the politics of Tamilnadu politicians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.