आश्विनने केली धोनीची पाठराखण

By Admin | Updated: June 24, 2015 01:00 IST2015-06-24T01:00:06+5:302015-06-24T01:00:06+5:30

बांगलादेशाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत पत्कराव्या लागलेल्या पराभवासाठी केवळ कर्णधार धोनीला दोषी धरता येणार नाही,

Ashwin helped Dhoni | आश्विनने केली धोनीची पाठराखण

आश्विनने केली धोनीची पाठराखण

मिरपूर : बांगलादेशाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत पत्कराव्या लागलेल्या पराभवासाठी केवळ कर्णधार धोनीला दोषी धरता येणार नाही, अशा शब्दांत फिरकीपटू रविचंद्रन आश्विनने कर्णधाराची पाठराखण केली. बांगलादेशाविरुद्ध मालिका गमावल्यामुळे धोनी सध्या टीकेचे लक्ष्य ठरला आहे.
बुधवारी खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या वन-डे लढतीच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत आश्विन म्हणाला, ‘‘या पराभवांसाठी केवळ एकटा धोनी जबाबदार नाही. हे सांघिक अपयश आहे. धोनी भारतीय क्रिकेटचा लिजेंड आहे. त्याने भारतीय संघासाठी बरेच काही केलेले आहे. संघाच्या कामगिरीसाठी त्याला एकट्याला दोषी धरणे योग्य नाही. संघ म्हणून आमची कामगिरी निराशाजनक ठरली. विजयासाठी सांघिक प्रयत्नाची गरज आहे.’’

Web Title: Ashwin helped Dhoni