आशिष नेहरा दिल्लीसाठी हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार

By Admin | Updated: February 17, 2017 00:31 IST2017-02-17T00:31:20+5:302017-02-17T00:31:20+5:30

इंग्लंडमध्ये आयोजित होणाऱ्या आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी उत्सुक असलेला अनुभवी वेगवान गोलंदाज

Ashish Nehra will play in Hazare Trophy for Delhi | आशिष नेहरा दिल्लीसाठी हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार

आशिष नेहरा दिल्लीसाठी हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार

नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये आयोजित होणाऱ्या आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी उत्सुक असलेला अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळेल. रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघातून खेळताना नेहरा दोन वर्षांनी ही स्पर्धा खेळेल.
त्याच वेळी १९ वर्षांखालील विश्वविजेता भारतीय संघाचा कर्णधार संघाबाहेर असून, त्याने यंदाच्या रणजी मोसमातील काही सामन्यांत दिल्लीचे नेतृत्व केले होते.
दिल्ली संघ : रिषभ पंत (कर्णधार), शिखर धवन, गौतम गंभीर, आशिष नेहरा, मिलिंद कुमार, ध्रुव शौरे, सार्थक रंजन, हिंमतसिंग, नितीश राणा, मनन शर्मा, पवन नेगी, पुलकित नारंग, प्रदीप सांगवान, नवदीप सैनी, विकास टोकस आणि कुलवंत खेजरोलिया. (वृत्तसंस्था)

Web Title: Ashish Nehra will play in Hazare Trophy for Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.