आर्याना सबालेन्का अजिंक्य
By Admin | Updated: December 27, 2015 02:30 IST2015-12-27T02:30:00+5:302015-12-27T02:30:00+5:30
डेक्कन जिमखाना क्लबतर्फे आयोजित १५ व्या २५ हजार डॉलर पुरस्काराच्या आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत बेलारूसच्या आर्याना सबालेन्का हिने रशियाच्या व्हिक्टोरिया कामशेकाया

आर्याना सबालेन्का अजिंक्य
पुणे : डेक्कन जिमखाना क्लबतर्फे आयोजित १५ व्या २५ हजार डॉलर पुरस्काराच्या आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत बेलारूसच्या आर्याना सबालेन्का हिने रशियाच्या व्हिक्टोरिया कामशेकाया हिचा ६-३, ६-४ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
डेक्कन जिमखाना क्लबच्या टेनिस कोर्टावर हा सामना झाला. आर्यानाने केवळ ६४ मिनिटांमध्ये सामना खिशात घातला. अंतिम सामन्याच्या पहिल्या गेममध्ये व्हिक्टोरियाने आर्यानाची सर्व्हिस भेदली तर, दुसऱ्या गेममध्ये आर्यानाने व्हिक्टोरियाची सर्व्हिस बे्रक केली. तिसरा गेम ड्यूसपर्यंत रंगला व यात आर्यानाने आपली सर्व्हिस राखली. चौथ्या गेममध्ये आर्यानाने व्हिक्टोरियाची सव्हिस बे्रक करून ४-१ अशी आघाडी घेतली. उंचापुऱ्या आर्यानाने कोर्टच्या तिरकस मारलेले फटके व ताकदवान बॅकहँड याच्यासमोर व्हिक्टोरियाकडे उत्तर नव्हते. यानंतरच्या गेममधील सर्व्हिस दोन्ही खेळाडूंनी राखल्या. आर्यानाने केवळ २६ मिनिटांमध्ये पहिला सेट ६-३ असा जिंकून विजयाची पायाभरणी केली. दुसऱ्या सेटच्या पाचव्या गेममध्ये आर्यानाने व्हिक्टोरियाची सव्हिस बे्रक केली व सहाव्या गेममध्ये आपली सर्व्हिस राखून ४-२ अशी आघाडी घेतली. व्हिक्टोरियाने सामन्यात कमबॅक करताना सलग दोन गेम जिंकून ४-४ अशी बरोबरी केली. आर्यानाने नवव्या गेममध्ये व्हिक्टोरियाची सर्व्हिस बे्रक केली व दहाव्या गेममध्ये आपली सर्व्हिस राखून ३८ मिनिटांमध्ये हा सेट ६-४ असा जिंकत विजेतेपदाला गवसणी घातली. (क्रीडा प्रतिनिधी)