मुंबई : अरुंधती पंतवणो हिने धक्कादायक निकाल लावताना अग्रमानांकित व विजेतेपदाची प्रबळ दावेदार असणा:या पी. सी. तुलसी हिला अवघ्या 28 मिनिटांमध्ये 2-क् असे नमवताना ओपन इंडिया चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात धडक मारली. दुस:या बाजूला पुरुष एकेरीमध्ये अव्वल खेळाडू एच. एस. प्रणॉयने आपल्या लौकिकानुसार अंतिम फेरी गाठली.
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या महिला गटात चौथ्या मानांकित अरुंधतीने खळबळ माजवताना दिमाखात अंतिम फेरी गाठली. सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्र घेताना तिने कालेल्या व गतविजेत्या पी. सी. तुलसीला कोणतीही संधी न देता 21-9, 21-15 असे नमवले. त्याचप्रमाणो बिगरमानांकित ऋत्विका गाडे शिवानी हिने देखील अनपेक्षित निकाल लावताना तृतीय मानांकित साईली राणोचे तगडे आव्हान 21-19, 21-18 असे परतवून लावले.
पुरुष गटात मात्र कोणतेही नाटय़ घडले नाही. संभाव्य विजेता आणि अग्रमानांकित प्रणॉयने आपला आंतरराष्ट्रीय दर्जा सिद्ध करताना सहाव्या मानांकित अजय जयरामचा कडवा प्रतिकार 21-13, 23-21 असा मोडताना झुंजाररीत्या अंतिम फेरी गाठली. अन्य एका उपांत्य सामन्यात चौथ्या मानांकित आर. एम. व्ही. गुरु साईदत्तने आपल्या अनुभवाच्या जोरावर पणास लावताना अक्षित महाजनचा 21-11, 21-11 असा धुव्वा उडवला.(क्रीडा प्रतिनिधी)
दुहेरीत श्लोक, श्यामची बाजी
च्पुरुष दुहेरीमध्ये श्लोक रामचंद्रन-श्याम शुक्ला यांनी के. नंदगोपाळ-अजरुन कुमार रेड्डी यांचा 2-क् असा सहज पाडाव करीत अंतिम फेरीत धडक मारली. त्याचवेळी मनु अट्री-बी. सुमन रेड्डी या अग्रमानांकित जोडीने अंतिम सामन्यात प्रवेश करताना कोणा तरुण-संतोष रावुरी यांचा अवघ्या 28 मिनिटांमध्ये 2-क् असा फडशा पाडला.
च्महिला दुहेरीमध्ये अपर्णा बालन-प्राजक्ता सावंत आणि जे. मेघना-के. मनीषा यांच्या विजेतेपदासाठी लढत रंगेल. त्याचप्रमाणो मिश्र दुहेरीमध्ये विजेतेपदास अग्रमानांकित जोडी अक्षय देवलकर-प्रज्ञा गद्रे आणि मनू अट्री-सिकी रेड्डी हे भिडतील.