अर्जेंटिना अंतिम फेरीत

By Admin | Updated: July 2, 2015 03:06 IST2015-07-02T03:06:37+5:302015-07-02T03:06:37+5:30

स्टार स्ट्रायकर लिओनेल मेस्सी याच्या शानदार खेळाच्या जोरावर बलाढ्य व विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या अर्जेंटिनाने उपांत्य सामन्यात पॅराग्वे संघाला ६-१ असे लोळवून

Argentina in the final round | अर्जेंटिना अंतिम फेरीत

अर्जेंटिना अंतिम फेरीत

कॉन्सेप्सिआॅन : स्टार स्ट्रायकर लिओनेल मेस्सी याच्या शानदार खेळाच्या जोरावर बलाढ्य व विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या अर्जेंटिनाने उपांत्य सामन्यात पॅराग्वे संघाला ६-१ असे लोळवून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.
देशाकडून खेळताना आजपर्यंत एकही स्पर्धा न जिंकलेल्या मेस्सीने या सामन्यात कोणतीही कसर न सोडता आपल्या लौकिकानुसार खेळ करीत संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखले. त्याचवेळी मोक्याच्यावेळी पूर्णपणे फॉर्ममध्ये येताना त्याने विजेतेपदासाठी आधीच अंतिम फेरीत पोहोचलेल्या चिलीला धोक्याचा इशारादेखील दिला आहे. शनिवारी कोपा अमेरिका स्पर्धेच्या विजेतेपदासाठी अर्जेंटिना व यजमान चिली यांच्यामध्ये अटीतटीची लढत रंगेल.दरम्यान, उपांत्य सामन्यात पॅराग्वेविरुध्द मेस्सीने एकही गोल नोंदवला नाही. मात्र, संघाच्या वतीने नोंदवलेल्या सहाही गोलमध्ये
त्याची भूमिका निर्णायक ठरली. मार्कोस रोजो आणि जेविअर पास्टोरे यांनी पहिल्याच सत्रात वेगवान गोल करताना अर्जेंटिनाला मध्यंतराला २-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर लुकास बैराइस याने महत्त्वपूर्ण गोल करताना पॅराग्वेची आघाडी १-२ अशी कमी केली. यावेळी पॅराग्वे पुनरागमन करणार असे दिसत होते. मात्र, अर्जेंटिनाच्या आक्रमकांनी तुफान हल्ला करताना पॅराग्वेच्या आव्हानातली हवाच काढली. या वेळी मेस्सीने जबरदस्त चाल रचताना प्रत्येक गोलमध्ये निर्णायक कामगिरी केली. मेस्सीने निर्माण केलेल्या संधीवर अग्नेल डी मारियाने दोन, तर सर्जिओ अग्युरो आणि गोंझालो हिग्युएन यांनी प्रत्येकी एक गोल केले.

Web Title: Argentina in the final round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.