अर्जेंटिनाला धक्का, मेस्सीवर चार सामन्यांची बंदी

By admin | Published: March 28, 2017 09:42 PM2017-03-28T21:42:30+5:302017-03-28T21:42:30+5:30

अर्जेंटिना संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सीवर चार आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास बंदी

Argentina ban, four match ban on Messi | अर्जेंटिनाला धक्का, मेस्सीवर चार सामन्यांची बंदी

अर्जेंटिनाला धक्का, मेस्सीवर चार सामन्यांची बंदी

Next
>ऑनलाइन लोकमत
झुरिच, दि. 28 - जगातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडूंपैकी एक आणि अर्जेंटिना संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सीवर चार आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच 10 हजार स्विस फ्रॅंकचा दंड सुनावण्यात आला आहे.  फिफाच्या शिस्तपालन समितीने मेस्सीवर बंदी घातली आहे.   
गेल्या आठवड्यात कट्टर प्रतिस्पर्धी चिलीविरुद्ध झालेल्या विश्वकरंडक पात्रता फेरीच्या सामन्यात सहाय्यक पंचासोबत गैरवर्तणूक आणि अपशब्द वापरल्याप्रकरणी  फिफाच्या शिस्तपालन समितीकडून मेस्सीवर बंदी घालण्यात आली आहे.  या कारवाईमुळे बोलिवियाविरुद्ध होणाऱ्या आजच्या सामन्यासह उरुग्वे, व्हेनेझुएला आणि पेरू या संघांविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यांना मेस्सी खेळू शकणार नाही.
चिलीविरूद्धच्या या सामन्यात  एका फाऊलवर सहाय्यक पंचाने फ्लॅग दाखवल्याने मेस्सी त्याच्यावर चांगलाच भडकला आणि अर्वाच्च भाषा वापरली, शिवाय सामना संपल्यानंतर मेस्सीने सहाय्यक पंचांशी हस्तांदोलनही केलं नाही.  त्यानंतर फिफाने थेट हस्तक्षेप करत मेस्सीवर कारवाई केली आहे. या सामन्यात मेस्सीने पेनल्टी किकवर केलेल्या गोलच्या बळावर अर्जेंटिनाने  चिलीचा 1-0 असा पराभव केला होता.  
पण मेस्सीवर टाकण्यात आलेली 4 सामन्याची बंदी अर्जेटिनासाठी मोठा धक्का आहे. कारण विश्वकरंडक पात्रता फेरीतील 5 सामन्यांपैकी 4 सामने अर्जेंटिनाला कर्णधाराविना खेळावे लागणार आहेत. 
 

Web Title: Argentina ban, four match ban on Messi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.