शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा : भारताच्या प्रथमेश जावकर याला तिरंदाजीत रौप्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 10:08 IST

Prathamesh Javakar : भारताचा कंपाउंड प्रकारातील तिरंदाज प्रथमेश जावकर हा डेन्मार्कच्या माथियास फुलर्टन याच्याविरुद्ध शूटऑफमध्ये पराभूत झाल्यामुळे त्याला विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. प्रथमेश हा युवा तिरंदाज बुलढाण्याचा आहे.

हर्मोसिलो : भारताचा कंपाउंड प्रकारातील तिरंदाज प्रथमेश जावकर हा डेन्मार्कच्या माथियास फुलर्टन याच्याविरुद्ध शूटऑफमध्ये पराभूत झाल्यामुळे त्याला विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. प्रथमेश हा युवा तिरंदाज बुलढाण्याचा आहे.

शांघाय विश्वचषक विजेता जावकर जगातील अव्वल तिरंदाज आणि गतविजेता माइक श्लोसेर याला चार महिन्यांत दुसऱ्यांदा नमवून अंतिम फेरीत पोहोचला होता. विजेतेपदाच्या लढतीत तो फुलर्टन याच्याकडून १४८-१४८ (१०-१०*) असा पराभूत झाला. फुलर्टनला लक्ष्याच्या अधिक जवळ निशाणा लावण्यात यश आल्यामुळे त्याला विजयी घोषित करण्यात आले. जावकर तिसऱ्या फेरीनंतर ८९-९० असा पिछाडीवर होता. चौथ्या फेरीत त्याने ३०-३० अशी बरोबरी साधली आणि ११९ वर गुणांची बरोबरी केली. पाचव्या आणि अंतिम फेरीत दोन्ही तिरंदाजांनी समान २९ गुण मिळवले. टायब्रेकरमध्येही दोघांचे गुण समान होते. पण किरकोळ फरकामुळे जावकरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. प्रथमेशने उपांत्य फेरीत श्लोसेर याला १५०-१४९ असे पराभूत केले. श्लोसेरने कांस्यपदकाच्या लढतीत अनुभवी खेळाडू अभिषेक वर्मा याला १५०-१४९ असे पराभूत केले.

महिला खेळाडूंकडून निराशाभारतीय महिला कंपाउंड तिरंदाजांनी निराशा केली. भारताच्या अदिती स्वामी आणि ज्योती सुरेखा वेन्नम दोघींनाही पहिल्या फेरीच्या पुढे मजल मारता आली नाही. ज्योतीला कोलंबियाच्या सारा लोपेझ हिने पाच गुणांच्या फरकाने पराभूत केले. सर्वांचे लक्ष जगज्जेत्या अदिती स्वामी हिच्यावर होते पण या १७ वर्षीय खेळाडूला दबावाचा सामना करण्यात अपयश आले. तिला डेन्मार्कच्या तंजा गेलेंथिएन हिच्याकडून शूटऑफमध्ये १४५-१४५ (९-१०) असा पराभव पत्करावा लागला.   

टॅग्स :Indiaभारत