तिरंदाजीमध्ये मधुरा देशमुख हिला ब्रांझ
By Admin | Updated: November 21, 2014 22:38 IST2014-11-21T22:38:29+5:302014-11-21T22:38:29+5:30
बार्शी :

तिरंदाजीमध्ये मधुरा देशमुख हिला ब्रांझ
ब र्शी : रांची येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील तिरदांजी स्पर्धेत बार्शीच्या शेठ आगरचंद कुंकूलोळ हायस्कूलची खेळाडू मधुरा गणेश हिने उत्कृष्ट तिरंदाजी दाखवून तिसरा क्रमांक मिळवून ब्रांझ पदकाची मानकरी ठरली. तिला हे ब्रांझ पदक बार्शी तालुक्यातील रांची येथे कार्यरत असलेले जिल्हाधिकारी रमेश घोलप यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. यापूर्वी वाशीम येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत यश मिळविल्यानंतर तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून निवड होऊन तिच्याबरोबरच नगरच्या दोन, अमरावतीची व बार्शीची प्रत्येकी एक अशा महाराष्ट्रातून चार खेळाडूंची निवड करण्यात आली होती. विजेत्या मधुरा देशमुख हिला मनगिरे व्यायामशाळेतील प्रशिक्षक अरविंद कोळी, व्यंकटेश पवार, संतोष खुडे यांचे मार्गदर्शन लाभले असून, या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब मनगिरे, चेअरमन महादेव बुचडे, संचालक रावसाहेब मनगिरे, मुख्याध्यापिका विजया खोगरे, पर्यवेक्षक सुनीता घाणेगावकर, उमा बुचडे यांच्यासह अनेकांनी तिचे अभिनंदन केले.