विद्यापीठ स्पर्धेत धनुर्विद्याचा समावेश
By Admin | Updated: August 27, 2014 21:30 IST2014-08-27T21:30:27+5:302014-08-27T21:30:27+5:30
लातूर : नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत धनुर्विद्या खेळाचा यंदाच्या मोसमापासून समावेश करण्यात आला आहे़ त्यामुळे महाविद्यालयीन खेळाडू आता धनुर्विद्याचा नेम साधताना दिसणार आहेत़

विद्यापीठ स्पर्धेत धनुर्विद्याचा समावेश
ल तूर : नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत धनुर्विद्या खेळाचा यंदाच्या मोसमापासून समावेश करण्यात आला आहे़ त्यामुळे महाविद्यालयीन खेळाडू आता धनुर्विद्याचा नेम साधताना दिसणार आहेत़ स्वा़रा़ती़म़ विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धेत या खेळाचा समावेश नव्हता़ विद्यापीठातील विविध जिल्हा संघटना व अनेक महाविद्यालयांनी ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट असलेल्या धनुर्विद्या खेळाचा समावेश विद्यापीठीय स्पर्धेत व्हावा याबाबत पाठपुरावा केला होता. विद्यापीठाच्या क्रीडा मंडळाने नुकतीच या खेळाला मान्यता दिली आहे़ त्यामुळे आता आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत ३३ क्रीडा प्रकार झाले आहेत़ गतवर्षीही विद्यापीठाने बॉक्सिंग खेळाचा समावेश यात केला होता़ याबाबत विद्यापीठाचे क्रीडा संचालक प्रा़डॉ़मनोज रेड्डी यांनी कुरुक्षेत्र येथे होणार्या आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी यंदाच्या वर्षात विद्यापीठाचा संघ सहभागी होणार असल्याचे सांगून लवकरच आंतर महाविद्यालयीन धनुर्विद्या स्पर्धेचे ठिकाण व तारीख महाविद्यालयांना कळविण्यात येणार असल्याचे सांगितले़ विद्यापीठ स्पर्धेत या खेळाच्या समावेशामुळे धनुर्विद्या खेळाडूंतून आनंद व्यक्त होत आहे़ (क्रीडा प्रतिनिधी)