आराश मेहता उपांत्य फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2015 03:25 IST2015-12-28T03:25:23+5:302015-12-28T03:25:23+5:30

तब्बल ५ गेमपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूलच्या आराश मेहताने झुंजार खेळ करताना जिंदाल स्कूलच्या राहुल धाराचे कडवे आव्हान ३-२ असे मोडून आंतर शालेय

Arash Mehta in the semifinals | आराश मेहता उपांत्य फेरीत

आराश मेहता उपांत्य फेरीत

मुंबई : तब्बल ५ गेमपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूलच्या आराश मेहताने झुंजार खेळ करताना जिंदाल स्कूलच्या राहुल धाराचे कडवे आव्हान ३-२ असे मोडून आंतर शालेय स्क्वॉश स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली. अन्य सामन्यात जिंदाल स्कूलच्याच अविनाश यादवने सहज बाजी मारताना उपांत्य फेरीत प्रवेश केला.
‘स्पोटर््स फॉर आॅल’ अंतर्गत नेरूळ येथील डी.वाय. स्पोटर््स स्टेडियम येथे सुरू असलेल्या शालेय क्रीडा महोत्सवातील स्क्वॉशचा १५ वर्षांखालील मुलांचा उपांत्यपूर्व सामना चांगलाच रंगला. पहिले दोन गेम सहज जिंकून २-० अशी आघाडी घेतलेल्या आराशला यानंतर राहुलने जबरदस्त पुनरागमन करताना सलग दोन गेममध्ये बाजी मारून सामना निर्णायक पाचव्या गेममध्ये नेला.
या वेळी पुन्हा एकदा दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ करताना सामना अटीतटीचा केला. मात्र मोक्याच्या वेळी खेळ उंचावताना आराशने राहुलवर दडपण टाकले आणि अंतिम गेमसह बाजी मारताना ११-९, ११-७, ९-११, ११-१३, ११-९ अशा गुणांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या बाजूला रंगलेल्या अन्य उपांत्यपूर्व सामन्यात एकतर्फी खेळ झाला. अविनाश यादवने सुरुवातीपासून राखलेला आक्रमक धडाका अखेरपर्यंत टिकवून ठेवत वेदान्त अंबानीला सहज नमवले. वेदान्तला पुनरागमनाची कोणतीही संधी न देताना अविनाशने ११-३, ११-६, ११-८ अशा विजयासह दिमाखात उपांत्य फेरी गाठली.
मुलांच्या १३ वर्षांखालील गटात आर्य विद्यामंदिरच्या आर्यमान जयसिंगनेदेखील झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना जिंदाल स्कूलच्या ओम जैसवालला पराभूत केले. पहिले दोन गेम गमावून पिछाडीवर पडल्यानंतर आर्यमानने फिनिक्स भरारी घेताना सलग तीन गेम जिंकून ओमचे आव्हान ५-११, ९-११, ११-५, ११-७, ११-६ असे संपुष्टात आणले. या विजयासह आर्यमानने उपांत्य फेरी गाठली. अन्य उपांत्यपूर्व सामन्यात आकाश गुप्ताने अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात धमाकेदार विजय मिळवताना आदित्य चौहानचा ११-०, ११-०, ११-० असा चुराडा केला. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Arash Mehta in the semifinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.