अरांता, करण यांची आगेकूच
By Admin | Updated: June 7, 2015 00:41 IST2015-06-07T00:41:39+5:302015-06-07T00:41:39+5:30
पीवायसी हिंंदू जिमखाना यांच्यातर्फे व डेक्कन जिमखाना यांच्या सहकार्याने आयोजित पहिल्या सिक्स् रेड स्नूकर अजिंंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत

अरांता, करण यांची आगेकूच
पुणे : पीवायसी हिंंदू जिमखाना यांच्यातर्फे व डेक्कन जिमखाना यांच्या सहकार्याने आयोजित पहिल्या सिक्स् रेड स्नूकर अजिंंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत माजी राष्ट्रीय महिला खेळाडू अरांता सँचेस् आणि वाशीच्या करण मंगत या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील बिलियर्डस् हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत माजी राष्ट्रीय महिला खेळाडू अरांता सँचेस् हीने माजी भारतीय खेळाडू विचय निच्चाणीचा ४-३ (१८-४४, ६७-५५, 0७-४८, 0९-५०, ३८-२६, ३५-३०, ३१-१६) असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. चुरशीच्या लढतीत विजय निच्चाणीने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत अरांताविरूध्द ३-१ अशी आघाडी घेतली. पिछाडीवर असलेल्या अरांताने उत्कृष्ट खेळ करीत पुढील तीनही फ्रेम जिंंकून विजय मिळवला. वाशीच्या करण मंगत याने शानदार खेळ करीत माजी आशियाई विजेत्या देवेंद्र जोशीचा ४-१ असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. पीवायसीच्या योगेश लोहियाने औरंगाबादच्या ओमर फारूखीचा ४-२ असा तर, पीवायसीच्या निमिश कुलकर्णीने समीर बिडवईला ४-२ असे नमवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
सविस्तर निकाल
दुसरी फेरी: मुकुंद भरडिया (बोरीवली) वि.वि. रोहन साकळकर (अॅपेक्स् स्पोर्टस्) ४-३ ; मनोज गाडगीळ (डेक्कन) वि.वि.राणा कडोळकर (पीवायसी) ४-२, राजवर्धन जोशी (पीवायसी) वि.वि. निनाद घाग (टेबल्स् ) ४-0 , कांकण शामसी (लखनऊ) वि.वि.सलिल देशपांडे (पीवायसी) ४-0 , निमिश कुलकर्णी (पीवायसी) वि.वि. समीर बिडवई ४-२, अभिनय एडके (डोंबिवली) वि.वि. सचिन संचेती (पीवायसी) ४-२;योगेश लोहिया (पीवायसी) वि.वि. ओमर फारूखी (औरंगाबाद) ४-२.