सोलापूर अकॅडमी उपांत्य फेरीत एप्रिल ग्रुप डॉ़ आंबेडकर चषक
By Admin | Updated: June 6, 2014 23:29 IST2014-06-06T23:29:05+5:302014-06-06T23:29:05+5:30
सोलापूर: पार्क क्रीडांगणावर एप्रिल ग्रुपच्या वतीने आयोजित डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत संदीप राठोडची अष्टपैलू खेळी आणि राजेश येमूलच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर सोलापूर अकॅडमीने टाइम्स इलेव्हनवर 154 धावांनी मात करीत उपांत्यफेरी गाठली़

सोलापूर अकॅडमी उपांत्य फेरीत एप्रिल ग्रुप डॉ़ आंबेडकर चषक
स लापूर: पार्क क्रीडांगणावर एप्रिल ग्रुपच्या वतीने आयोजित डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत संदीप राठोडची अष्टपैलू खेळी आणि राजेश येमूलच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर सोलापूर अकॅडमीने टाइम्स इलेव्हनवर 154 धावांनी मात करीत उपांत्यफेरी गाठली़दुसर्या सामन्यात पुष्प क्रिकेट अकॅडमीने डायमंड क्रिकेट क्लबवर 70 धावांनी मात करीत विजय नोंदवला़पहिल्या सामन्यात सोलापूर अकॅडमीने संदीप राठोड (79) आणि राजेश येमूल (61) यांच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 194 धावा केल्या़ हणमंतु पुजारीने 20 धावा केल्या़ टाइम्स इलेव्हनकडून आनंद माने याने 24 धावात दोन बळी घेतल़े प्रत्युत्तरात टाइम्स इलेव्हन संघ 12 षटकात 40 धावात गारद झाला़ यात मकरंद जाधव 15 तर आनंद खमितकरने 13 धावा केल्या़ सोलापूर अकॅडमीकडून राहुल सोनवणे 6/5 बळी तर संदीप राठोडने 7/2 बळी घेतल़े हा सामना सोलापूर अकॅडमीने 154 धावांनी जिंकला़दुसर्या सामन्यात पुष्प अकॅडमीने 20 षटकात 7 बाद 129 धावा केल्या़ यात प्रशांत बंकापुरे 34, दिनेश टिकोळेने 31 धावा केल्या़ डायमंडकडून सनी गाडेकर 31/2 तर सुमीत होसमनीने 24/2 बळी घेतल़े प्रत्युत्तरात डायमंड 14़3 षटकात 59 धावात गारद झाला़ यात सनी गाडेकर 21, मल्लिकार्जुन आवटेने 13 धावा केल्या़ पुष्पकडून अविनाश देवकते 12/3 तर अक्षय हावळेने 5/2 बळी घेतल़े हा सामना पुष्प अकॅडमीने 70 धावांनी जिंकला़पंच म्हणून चंद्रकांत मंजेली, सुनील ढोले यांनी काम पाहिल़े