शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्वी चंदेला ठरली अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 03:12 IST

जागतिक क्रमवारी : १० मीटर एअर रायफलमध्ये वर्चस्व

नवी दिल्ली : भारताची आघाडीची नेमबाज अपूर्वी चंदेला हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविले. भारताचीच अंजुम मोदगिल हिने सुद्धा या वर्षात शानदार प्रदर्शन करताना दुसऱ्या क्रमांकावर कब्जा केला. जयपूरच्या अपूर्वी त्या पाच भारतीय नेमबाजांमध्ये आहे ज्यांनी २०२० ऑलिम्पिकसाठी कोटा मिळवला आहे. चंदेलाने फेब्रुवारीमध्ये आयएसएस विश्वचषक स्पर्धेत २५२.९ असा विक्रमी गुण मिळवत सुवर्णपदक पटकाविले होते. तिने २०१४ मध्ये ग्लास्गो राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे.२०१८ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत चंदेला हिने १० मीटर मिश्र रायफल स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले होते.

चंदेलाने आपला आनंद ट्विटरवर व्यक्त केला. तिने म्हटले की, ‘आज जगात पहिले स्थान मिळवल्याचा खूप आनंद आहे. नेमबाजी कारकीदीर्तील हा सर्वाेत्तम क्षण आहे.’ २६ वर्षीय चंदेला हिने टोकियो ऑलिम्पिकसाठी स्थान प्राप्त केले आहे. मात्र, बीजिंग येथे नुकताच झालेल्या आयएसएसएफ विश्चषकात चंदेला २०७.८ गुणांसह चौथ्या क्रमांकावर राहिली होती. अंजुम मोदगिलने मात्र या स्पर्धेतमिश्र सांघिक गटात दुसरे मानांकन प्राप्त केले होते. युवा नेमबाज मनु भाकर ही २५ मीटर पिस्तूल महिला गटात जगात दहाव्या क्रमांकाची नेमबाज बनली आहे. पुरुष गटामध्ये दिव्यांशसिंग पनवारने विश्वचषकात १० मीटर एअर रायफल गटात चौथे स्थान मिळवले आहे. त्याचबरोबर दिव्यांशने बीजिंगमध्ये १० मीटर एअर रायफल आणि १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक गटात दोन सुवर्णपदकांची कमाई केली होती. या दिमाखदार कामगिरीसह त्याने २०२० टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतासाठी कोटासुद्धा मिळवला आहे. 

 

टॅग्स :IndiaभारतTwitterट्विटर