अनुराग ठाकूर यांनी विनाअट माफी मागितली

By Admin | Updated: July 14, 2017 01:01 IST2017-07-14T01:01:20+5:302017-07-14T01:01:20+5:30

न्यायालयाच्या अवामानप्रकरणी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष व भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात विनाअट माफी मागितली आहे

Anurag Thakur asked for unauthorized apology | अनुराग ठाकूर यांनी विनाअट माफी मागितली

अनुराग ठाकूर यांनी विनाअट माफी मागितली

नवी दिल्ली : न्यायालयात शपथपत्र सादर केल्यानंतर खोटी साक्ष देणे आणि न्यायालयाच्या अवामानप्रकरणी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष व भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात विनाअट माफी मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबत अनुराग ठाकूर यांच्यातर्फे माफीनामा सादर करण्यात आला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी सुनावणी करणार आहे.
माफीनाम्यामध्ये ठाकूर यांनी म्हटले आहे की, चुकीची माहिती व चुकीचा समज झाल्यामुळे हे घडले असून कुठल्याही अटीविना माफी मागत आहो. न्यायालयाच्या प्रतिष्ठेला कधीच कमी लेखण्याचा प्रयत्न केलेला नाही, असेही ठाकूर म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने ७ जुलै रोजी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना विनाअट माफीनामा सादर करण्यास सांगितले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Anurag Thakur asked for unauthorized apology