शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

"विनेश फोगाट चांगली कुस्तीपटू आहे पण...", अंतिम पंघालनं आशियाई स्पर्धेसाठी फुंकलं रणशिंग

By ओमकार संकपाळ | Updated: August 24, 2023 16:58 IST

कुस्तीपटू विनेश फोगाटने दुखापतीच्या कारणास्तव आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली आहे.

नवी दिल्ली : भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटनं दुखापतीच्या कारणास्तव आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली आहे. अशातच २० वर्षांखालील जागतिक स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू अंतिम पंघालनं पदक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच विनेश फोगाटपेक्षा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं तिनं सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी विनेशला थेट प्रवेश देण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी पंघालची याचिका फेटाळण्यात आली. अखेर गुडघ्याच्या दुखापतीमुळे विनेशने आशियाई स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. अंतिम पंघालला तिची अनुभवी जोडीदार विनेश, जी आशियाई खेळांची चॅम्पियन आहे आणि अनेक आशियाई चॅम्पियनशिप पदक विजेती आहे, हिच्या कामगिरीबद्दल चांगलीच माहिती आहे.

खरं तर विनेश फोगाट ही एकमेव भारतीय महिला कुस्तीपटू आहे, जिने दोन जागतिक चॅम्पियनशिप पदके जिंकली आहेत. रिओ (२०१६) आणि टोकियो (२०२१) या दोन ऑलिम्पिक खेळांमध्ये विनेशचा सहभाग असला तरी तिला पदक जिंकण्यात अपयश आलं होतं. आगामी स्पर्धेबद्दल बोलताना अंतिम पंघाल म्हणाली की, विनेश खूप चांगली कुस्तीपटू आहे, तिने राष्ट्रकुल क्रीडा, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि जागतिक स्पर्धेत पदकं जिंकली आहेत. पण, मी तिच्यापेक्षा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन. तिच्यापेक्षा जास्त मेहनत करून तिच्यापेक्षा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन.

अंतिम पंघालनं फुंकलं रणशिंग "माझा सराव चांगला चालला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी मी बराच काळ सराव करत आहे", असं पंघालनं सरावाबद्दल सांगितलं. पंघालने मागील आठवड्यात जॉर्डनमधील अम्मान येथे झालेल्या २० वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ५३ किलो वजनी गटाचे विजेतेपद राखले. पंघाल आणि विनेश या दोघी ५३ किलो वजनी गटात कुस्ती खेळतात. पण, पंघालने चाचण्या पास केल्या अन् विनेशची आपोआप आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आणि दोघांमधील आखाड्याबाहेरील कुस्ती सुरू झाली. 

आगामी मोठ्या स्पर्धेत सर्वच देशांचे कुस्तीपटू खूप मजबूत असतील. ही माझी पहिली आशियाई स्पर्धा आहे, त्यामुळे मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन. मी माझ्या खेळावर खूप मेहनत घेत आहे, मानसिकदृष्ट्या शांत राहण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. मी फक्त 'रिलॅक्स' होण्याचा प्रयत्न करते, असं अंतिम पंघालनं स्पष्ट केलं.  

टॅग्स :Vinesh Phogatविनेश फोगटAsian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Wrestlingकुस्तीIndiaभारत