ंआशियाड जोड२
By Admin | Updated: October 4, 2014 22:54 IST2014-10-04T22:54:44+5:302014-10-04T22:54:44+5:30
स्टार महिला बॉक्सर मेरीकोमने आशियाडचे पहिले सुवर्ण पटकावले. एल. सरिता देवीच्या कामगिरीवर वाद होताच पदक स्वीकारण्यास तिने नकार दिला. यानंतर सुमारीवाला यांनी ओसीएच्या सुनावणीत सहभागी होऊन सरिताचे कांस्य पदक परत आणले. निलंबनाच्या भीतीपोटी तिने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेकडे माफीनामादेखील सादर केला. भारताने ग्वांगझू येथे ॲथ्लेटिक्स प्रकारात पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि पाच कांस्य पदके जिंकली होती. येथे १३ पदके मिळाली, त्यात दोन सुवर्ण, चार रौप्य आणि सात कांस्यांचा समावेश आहे.

ंआशियाड जोड२
स टार महिला बॉक्सर मेरीकोमने आशियाडचे पहिले सुवर्ण पटकावले. एल. सरिता देवीच्या कामगिरीवर वाद होताच पदक स्वीकारण्यास तिने नकार दिला. यानंतर सुमारीवाला यांनी ओसीएच्या सुनावणीत सहभागी होऊन सरिताचे कांस्य पदक परत आणले. निलंबनाच्या भीतीपोटी तिने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेकडे माफीनामादेखील सादर केला. भारताने ग्वांगझू येथे ॲथ्लेटिक्स प्रकारात पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि पाच कांस्य पदके जिंकली होती. येथे १३ पदके मिळाली, त्यात दोन सुवर्ण, चार रौप्य आणि सात कांस्यांचा समावेश आहे.विविध कारणांमुळे गेल्या दोन आशियाडमधून बाहेर राहिलेली सीमा पुनिया हिने थाळीफेकीत सुवर्ण जिंकले. याशिवाय ४ बाय ४०० मीटर महिला रिले संघ सुवर्णाचा मानकरी ठरला. मंजूबाला हिला हातोडाफेकीत मिळालेल्या कांस्याचे नंतर निकाल बदलल्याने रौप्यात रूपांतर झाले. थाळीफेकीतील खेळाडू विकास गौडा सुवर्ण जिंकण्यात अपयशी ठरला, तर तिहेरी उडीत अरपिंदरसिंग आणि रंजित माहेश्वरी यांना पदकाविना परतावे लागले. भारतीय संघ अन्य खेळात प्रभावी कामगिरी बजावू शकला नाही. पण वूशु प्रकारात दोन कांस्य पदकांची कमाई झाली. जलतरणात संदीप सेजवाल याने ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकम्ये कांस्य जिंकले. भारताने महिला सेलिंगच्या २९ ईआर प्रकारातही पहिल्यांदा कांस्याची कमाई केली, हे विशेष.(वृत्तसंस्था)