बीसीसीआयला आणखी एक धक्का
By Admin | Updated: August 7, 2014 00:15 IST2014-08-07T00:15:09+5:302014-08-07T00:15:09+5:30
रवींद्र जडेजाला डिवचल्याप्रकरणी इंग्लंडचा जलद गोलंदाज जेम्स अॅण्डरसन याच्याविरुद्ध गार्डन लुईस यांनी दिलेल्या निर्णयावर अपील करण्याची भारताची विनंती आयसीसीने फेटाळून लावली आहे.

बीसीसीआयला आणखी एक धक्का
>नवी दिल्ली : रवींद्र जडेजाला डिवचल्याप्रकरणी इंग्लंडचा जलद गोलंदाज जेम्स अॅण्डरसन याच्याविरुद्ध गार्डन लुईस यांनी दिलेल्या निर्णयावर अपील करण्याची भारताची विनंती आयसीसीने फेटाळून लावली आहे.
बीसीसीआयने आयसीसीचे सीईओ डेव्ह रिचर्ड्सन यांना मंगळवारी पत्र लिहून लुईस यांनी अॅण्डरसनबाबत दिलेल्या निर्णयाविरुद्ध अपील करण्याचे आवाहन केले होते. या प्रकरणात केवळ रिचर्ड्सन हेच लुईस यांच्या निर्णयाविरुद्ध अपील करू शकले असते. आयसीसीचे नवे अध्यक्ष एन. श्रीनिवासन हे मात्र या संपूर्ण प्रकरणात अलिप्त राहिले. प्रमुखपदी श्रीनिवासन असताना आयसीसीचे सीईओ रिचर्ड्सन यांनी अपील करण्याचा अधिकार असूनही नकार दिल्याने बीसीसीआयला धक्का बसला. अपील का केले नाही, याबद्दल स्वत:ची बाजू मांडताना रिचर्डसन म्हणाले, की शिस्तपालन प्रक्रियेचा भाग म्हणून मी अपील न करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी आलेला लेखी निर्णय ग्राह्य मानण्यात आला. या निर्णयावर आयसीसी पूर्णपणो समाधानी आहे.
अॅण्डरसन आणि जडेजा यांच्यातील वादाची चौकशी करणारे आयुक्त लुईस यांनी दोन्ही खेळाडूंना पुराव्याअभावी निदरेष ठरविले. पण, अॅण्डरसनला मोकळे सोडल्याबद्दल भारताने नाराजीचा सूर
आळवला. ट्रेंटब्रिज कसोटीदरम्यान जडेजाला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्यावरून अॅण्डरसनवर लेव्हल तीन अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. (वृत्तसंस्था)
रिचर्डसन पुढे म्हणाले, की तपास निष्पक्ष झाला. दोन्ही पक्षांना प्रश्न विचारणो आणि साक्षी नोंदविण्याची समान संधी देण्यात आली. बीसीसीआयच्या अपीलमध्ये कुठलेही तथ्य नसल्याची आमची भावना आहे. अपील करणो हे खेळ आणि खेळ भावनेविरुद्ध होईल. हा मुद्या संवेदनशील असून, दोन्ही खेळाडूंविरुद्ध आरोप आहेत.
उभय पक्षांकडून परस्परांविरुद्ध 13 साक्षी नोंदविण्यात आल्या. लुईस यांनी दिलेल्या निर्णयावर आयसीसीने गंभीर विचार केला. लुईस हे अनुभवी आहेत. त्यामुळे हे प्रकरण पुन्हापुन्हा ताजे करणो योग्य ठरणार नाही.