बेतकी मंडोदरी देवस्थानचा वर्धापनदिन
By Admin | Updated: December 2, 2014 00:35 IST2014-12-02T00:35:57+5:302014-12-02T00:35:57+5:30
सावईवेरे : बेतक ी येथील मंडोदरी देवस्थानचा घटनापूर्ती वर्ष १0४ व वर्धापनदिन बुधवार दि. ३ डिसंेबर व गुरुवार दि. ४ डिसेंबर असा दोन दिवस विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमानिशी साजरा करण्यात येणार आहे.

बेतकी मंडोदरी देवस्थानचा वर्धापनदिन
स वईवेरे : बेतक ी येथील मंडोदरी देवस्थानचा घटनापूर्ती वर्ष १0४ व वर्धापनदिन बुधवार दि. ३ डिसंेबर व गुरुवार दि. ४ डिसेंबर असा दोन दिवस विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमानिशी साजरा करण्यात येणार आहे.यानिमित्त ३ रोजी सकाळी देवस्थानात विविध धार्मिक विधी, संध्या. ७.३0 वा. गौरव सोहळा व माया मंडोदरी स्मरणिका प्रकाशन सोहळा होणार आहे. यासोहळयास प्रमुख पाहुणे म्हणून दिपक ढवळीकर,केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, उद्योजक सुरेश फडते, सरपंच श्रध्दा फडते, कालिदास सावईकर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नंतर रात्री ८.३0 वाजता सुपर नोवा डान्स कार्यक्रम होणार आहे. गुरुवार दि. ४ रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी आरती, महाप्रसाद व संध्याकाळी भजन रात्री ८ वाजता श्रीची पालखी, पावणी ९ वाजता स्वर निनाद हा सुगम संगीताचा कार्यक्रम होणार आहे. यात अक्षय नाईक व मुग्धा गावकर हे गायक कलाकार भाग घेणार आहेत. (प्रतिनिधी)