कॅरम : जुनिअर गटात अंकित मोहिते - सेजल लोखंडे विजयी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 10:54 PM2019-07-15T22:54:09+5:302019-07-15T22:55:22+5:30

सेजल लोखंडेने तिच्याच क्लबच्या सहकारी समृद्धी चव्हाणला २१-४ व २१-८ असे सहज पराभूत करून या गटाचे विजेतेपद पटकाविले. 

Ankit Mohite - Sejal Lokhande won the junior category | कॅरम : जुनिअर गटात अंकित मोहिते - सेजल लोखंडे विजयी 

कॅरम : जुनिअर गटात अंकित मोहिते - सेजल लोखंडे विजयी 

Next

मुंबई : मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व चित्तपावन ब्राह्मण संघ, मुंबई यांच्या संयुक्त विद्दमाने चित्तपावन ब्राह्मण संघ, गिरगाव येथे सुरु असलेल्या ९ व्या अध्यक्षीय चषक मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत चांगलीच चुरस पाहायला मिळाली. १८ वर्षाखालील एकेरी मुलांमध्ये विजय कॅरम क्लबच्या अंकित मोहितेने डी. के.सी. सी. च्या सार्थक  नागावकरला अंतिम फेरीत तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतील पराभूत करून या गटाचे विजेतेपद पटकाविले. पहिला सेट सार्थकने ८-२१ असा सहज जिंकून सुरुवात चांगली केली होती. परंतु दुसऱ्या व तिसऱ्या सेटमध्ये अंकितने २१-५ व २१-० असा विजय मिळविला. तर मुलींच्या १८ वर्षाखालील एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, नायगावच्या  सेजल लोखंडेने तिच्याच क्लबच्या सहकारी समृद्धी चव्हाणला २१-४ व २१-८ असे सहज पराभूत करून या गटाचे विजेतेपद पटकाविले. 

महिला एकेरीच्या उपांत्य लढतीत जैन इरिगेशनच्या निलम घोडकेने रिझर्व्ह बँकेच्या उर्मिला शेंडगेवर अटीतटीच्या लढतीत २४-१३, १५-२५ व २५-१२ असा चुरशीचा विजय मिळविला. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात जैन इरिगेशनच्याच मिताली पिंपळेने रिझर्व्ह बँकेच्या अनुभवी संगीता चांदोरकरवर २५-१५, १२-२५ व २५-१५ असा विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. 

Web Title: Ankit Mohite - Sejal Lokhande won the junior category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई