शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

अनीश भानवालचा नेमबाजीत सुवर्णवेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 03:07 IST

उदयोन्मुख नेमबाज अनीश भानवालने सोमवारी आयएसएसएफ ज्युनिअर विश्वकपमध्ये २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले

सिडनी : उदयोन्मुख नेमबाज अनीश भानवालने सोमवारी आयएसएसएफ ज्युनिअर विश्वकपमध्ये २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत भारताचे वैयक्तिक स्पर्धेत तिसरे सुवर्णपदक आहे.१५ वर्षीय या खेळाडूने सर्वोच्च स्कोअरसह फायनलमध्ये स्थान मिळवले होते. अंतिम फेरीत त्याला भारताच्या अनहज जावान्दा व राजकुमार सिंग संधू यांच्याव्यतिरिक्त चीनच्या तीन नेमबाजांच्या आव्हानाला सामोरे जावे लागले.पात्रता फेरीत ५८५ गुणांसह अव्वल स्थानावर राहिलेल्या अनीशने अंतिम फेरीत २९ अचूक नेम साधताना कारकिर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय पदक पटकावले.अनीशच्या सुवर्णपदकासह भारतीय संघाने एकूण १५ पदकांसह तालिकेत चीननंतर दुसरे स्थान गाठले. भारताच्या खात्यावर सहा सुवर्ण, तीन रौप्य व सहा कांस्यपदकांची नोंद आहे. चीनने विक्रमी १७३३ अंकांसह २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत सांघिक प्रकारात सुवर्ण पदकाचा मान मिळवला. अनीश भानवाला, जावांदा व आदर्श सिंग यांच्या संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे सांघिक कांस्यपदकही भारतीय खेळाडूंनी पटकावले. त्यात संधूसोबत जपत्येश सिंग जसपाल व मनदीप सिंग यांचा समावेश होता. (वृत्तसंस्था)याआधी मेक्सिको येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सत्रात अनीश याच प्रकारात सातव्या स्थानी राहिला होता. यावेळी मात्र त्याने कोणतीही कसर ठेवता सहज वर्चस्व मिळवले.विशेष म्हणजे अंतिम फेरीत अचूक पाच नेम साधणारा तो एकमेव नेमबाज ठरला आणि हाच फरक त्याच्यात व इतर नेमबाजांमध्ये राहिला. अनीसच्या धडाक्यापुढे चेंग झिपेंग आणि झांग ज्युमिंग या चिनी नेमबाजांना अनुक्रमे २७ आणि २० हीट्ससह रौप्य आणि कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.