अँडरसन - जाडेजा वाद, ICC ने भारताचे अपील फेटाळले

By Admin | Updated: August 6, 2014 17:33 IST2014-08-06T17:23:51+5:302014-08-06T17:33:18+5:30

रविंद्र जाडेजा आणि जेम्स अँडरसन वादात अँडरसनला निर्दोष मुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केलेले अपील आयसीसीने फेटाळले आहे.

Anderson - Jadeja controversy, ICC rejects India's appeal | अँडरसन - जाडेजा वाद, ICC ने भारताचे अपील फेटाळले

अँडरसन - जाडेजा वाद, ICC ने भारताचे अपील फेटाळले

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. ६ - रविंद्र जाडेजा आणि जेम्स अँडरसन वादात अँडरसनला निर्दोष मुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केलेले अपील आयसीसीने फेटाळले आहे. गोर्डन लुईस यांनी दिलेल्या निर्णयाशी आयसीसी पूर्णपणे सहमत आहे असे आयसीसीने म्हटले आहे. 
ट्रेन्टबिज कसोटी दरम्यान भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाला इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसनने शिवीगाळ आणि धक्काबूक्की केली होती. याप्रकरणी आयसीसीचे न्यायिक आयुक्त गॉर्डन लुईस यांच्यासमोर सुनावणी झाली होती. लुईस यांनी सबळ पुराव्याअभावी अँडरसनला निर्दोष मुक्त केले. या निर्णयाविरोधात बीसीसीआयने आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांना अपील दाखल करण्यासाठी पत्र लिहीले होते. लुईस यांच्या निर्णयावर अपील करण्याचे सर्वाधिकार रिचर्डसन यांनाच होते. मात्र बुधवारी रिचर्डसन यांनी या निर्णयावर अपील करणार नाही असे स्पष्ट करुन बीसीसीआयला धक्का दिला. 'संपूर्ण प्रक्रिया ही पारदर्शकपद्धतीने पार पडली. दोन्ही पक्षांना व साक्षीदारांना त्यांची बाजू मांडण्याची पूर्ण संधी देण्यात आली होती. त्यामुळे बीसीसीआयने केलेल्या अपीलमध्ये तथ्य नसून लुईस यांच्या निर्णयावर अपील करणे हे खेळ भावनेला धक्का पोहचवणारे कृत्य ठरेल असे आयसीसीचे सीईओ रिचर्डनस यांनी सांगितले. 

Web Title: Anderson - Jadeja controversy, ICC rejects India's appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.