अँडरसनने वापरले धोनीला अपशब्द
By Admin | Updated: August 6, 2014 03:17 IST2014-08-06T03:17:18+5:302014-08-06T03:17:18+5:30
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अॅँडरसन याने अत्यंत घाणोरडय़ा शब्दांत संबोधल्याचे वृत्त ‘द मिरर’ या वृत्तपत्रने दिले आहे.

अँडरसनने वापरले धोनीला अपशब्द
लंडन : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अॅँडरसन याने अत्यंत घाणोरडय़ा शब्दांत संबोधल्याचे वृत्त ‘द मिरर’ या वृत्तपत्रने दिले आहे. रवींद्र जडेजाचे दात तोडण्याची धमकी दिल्याचाही आरोप अँडरसनवर करण्यात आला होता. यामुळे तो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क याच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.
अॅँडरसन-जडेजा वादाच्या सुनावणीची काही माहिती भारतीय पत्रकारांना मिळाली असून, यात अॅँडरसन दोषी असल्याचे स्पष्ट कळते. ‘जर तो भारतीय ड्रेसिंग रूमच्या जवळपास फिरकला, तर त्याला आयुष्यातून उठवेल,’ अशा शब्दांत धोनीने अॅँडरसनला सांगितल्याचे समजते.
न्यायिक आयुक्त गोर्डान लेविस यांनी अॅँडरसन आणि जडेजा या दोघांनाही दोषमुक्त केले असले, तरी या वादामुळे क्रिकेटरसिकांना मात्र धक्का बसला आहे.