अन् अश्रूंच्या लाटा उसळल्या

By Admin | Updated: July 10, 2014 01:32 IST2014-07-10T01:32:32+5:302014-07-10T01:32:32+5:30

नुसता अपघात झाला नाही, तर अवघं बि:हाड चिरडलं गेलं. जर्मनीनं तब्बल 7-1 अशा ब्राझीलच्या चिंधडय़ा उडवल्या

And the tears of the tears were shaken | अन् अश्रूंच्या लाटा उसळल्या

अन् अश्रूंच्या लाटा उसळल्या

संदीप चव्हाण
रिओ द जनेरिओ : रिओ द जनेरिओत दोन ठिकाणं खूप फेमस आहेत.. पहिलं जागतिक आश्चर्य असलेला ािस्त दी रिडीमरचा भव्य पुतळा आणि त्याला सामोरा असणारा कोपाकबाना हा रिओचा अतिसुंदर बीच.. उसळत्या लाटांचा फेस अंगावर ङोलत ग्लासातील फेसळणारी बीअर रिझवणं ही येथील खासियत. याच रिओत यंदाच्या वर्ल्डकपची फायनल असल्यामुळे यजमान ब्राझीलच्या टीमच्या स्वागतासाठी अवघं शहर नववधूसारखं सजलं होतं; पण लग्नाला येणा:या बि:हाडाला ऐन रस्त्यात जीवघेणा अपघात व्हावा अगदी तसचं ब्राझीलच्या टीमचं झालं. नुसता अपघात झाला नाही, तर अवघं बि:हाड चिरडलं गेलं. जर्मनीनं तब्बल 7-1 अशा ब्राझीलच्या चिंधडय़ा उडवल्या आणि त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणलं. लग्नापूर्वीचं जणू कपाळावरील कुंकू  पुसल्यागत हे शहर क्षणार्धात भकास झालं.
याच कोपाकबाना बीचवर आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघानं फुटबॉल फेस्टचं आयोजन केलंय. सोनेरी वाळूत सांबा नृत्य करत भव्य स्क्रीनवर मॅच पाहण्यासाठी जगभरातील लाखो फुटबॉलप्रेमी येथे गेले महिनाभर जमताहेत. हाती वर्ल्डकप फायनलची तिकीट नसतानाही त्यांची पावले रिओकडे वळलीत. त्यामुळे या कोपाकबाना बीचवर अवघं जग एकत्र पाहायला मिळतंय. साधारणत: येथील वेळेनुसार सायंकाळी पाच वाजता मॅचशेजारील राज्य बेले होरिझोंटोत सुरू होणार होती; पण कोपाकबाना बीच दुपारी तीन वाजेर्पयत हाऊसफुल्ल झाला होता. पावसाची रिमङिाम सुरू होती, तरीही गर्दी हटायचं नाव घेत नव्हती. आधीच येथील स्त्री-पुरुषांच्या अंगावर कपडे शोधावे लागतात; पण जे काही तोकडे कपडे घातले होते, त्याचा रंग मात्र पिवळा होता. ब्राझीलचा पिवळा रंग ल्याल्यामुळे कोपाकबानाच्या बीचला जणू मावळत्या संध्याकाळी सोनेरी छटा आली होती. आणि अखेर तो क्षण आला. मॅच सुरू झाली.. जो तो गळ्यातील ािस्ताचा ताईत अथवा ाुसचं चुंबन घेऊन जणू आपल्या लाडक्या टीमला शुभेच्छा देत होते. आधीच टीममध्ये नेयमार आणि कॅप्टन सिल्व्हा नसल्यामुळे अवघी ब्राझीलची टीम देवभरोसे होती. शेवटी व्हायचं तेच झाल़े़़ ािस्तही या ब्राझीलचा सर्वनाश टाळू शकला नाही. आपले दोन्ही हात पसरून अवघ्या जगाचा उद्धार करणारी ािस्ताची मूर्ती हे ब्राझीलचं वैभव मानलं जातं. जगभरात ही मूर्ती मुक्तीदाता म्हणून ओळखली जाते. त्या ािस्तानंही ब्राझीलचा हा आत्मघात पाहून कपाळावर हात मारून घेतला असेल. खेळात हार-जीत ही होतच असते; पण पराभव इतका लाजिरवाणा असू शकतो, यावर विश्वास ठेवायला ब्राझीलवासी तयार नव्हते. मला पोर्तुगीज भाषा येत नाही; पण ब्राझीलचा पराभव सुरू असताना कोपाकबानाच्या बीचवर या भाषेतील सर्व शिव्यांशी माझी तोंडओळख झाली. जवळपास प्रत्येक जणच बीअरच्या प्रत्येक घुटक्यागणिक टीमला शिव्यांची लाखोली वाहत होता. हे तेच प्रेक्षक होते, ज्यांनी गेल्या पाच मॅचमध्ये विजयानंतर टीमला डोक्यावर घेतले होते. पराभवानंतर त्यांनी टीमला अक्षरश: पायदळी तुडवले. 
 
मॅच संपल्याचं रेफ्र ीनं जाहीर करताच कोपाकबानाच्या 
बीचवर अश्रूंचा अक्षरश: महापूर उसळला. त्यात माङो अश्रू कधी मिसळले, हे कळलेच नाही. भानावर आलो तेव्हा समोर होती ती फक्त स्मशानशांतता़ कारण ब्राझीलचे फुटबॉलमधील वैभव त्यांच्याच जमिनीत गाडले गेले होते, खूप खोल..

 

Web Title: And the tears of the tears were shaken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.