आनंदचा फायटिंग ड्रॉ!

By Admin | Updated: November 9, 2014 02:23 IST2014-11-09T02:23:08+5:302014-11-09T02:23:08+5:30

भारताचा पाच वेळचा विजेत्या विश्वनाथन आनंदने ‘आउट ऑफ फायटिंग’ खेळ करीत गतविजेत्या नॉर्वेच्यामॅग्नस कार्लसनला बरोबरीवर रोखले.त्या

Ananda's drawing of draws! | आनंदचा फायटिंग ड्रॉ!

आनंदचा फायटिंग ड्रॉ!

जागतिक बुद्धिबळ : पहिल्या डावात कार्लसनविरुद्ध झाल्या 48 चाली
सॉची (रशिया) : संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताचा पाच वेळचा विजेत्या विश्वनाथन आनंदने ‘आउट ऑफ फायटिंग’ खेळ करीत गतविजेत्या नॉर्वेच्यामॅग्नस कार्लसनला बरोबरीवर रोखले.त्यामुळे दोघांनाही प्रत्येकी अध्र्या गुणांवर समाधान मानावे लागले.
सामन्यात आनंदकडे  पांढरी मोहरी असल्याने तो पहिली चाल काय करणार, तो कोणती चाल खेळतो याची उत्कंठा जगातील सर्व बुद्धिबळ प्रेमींना लागली होती.  पहिल्याच डावात आनंदने वजिरासमोरील प्यादे दोन घरे पुढे टाकून डाव सुरू केला. (ही चाल बुद्धिबळविश्वात लोकप्रियतेच्या दुस:या क्रमांकावर आहे) 
मॅग्नस कार्लसनने त्याला अश्व (एफ 6) असे उत्तर दिले. त्यानंतर मॅग्नस कार्लसनने ग्रुनफेल्ड बचावात आपल्या खेळाचे रूपांतर केले.  मॅग्नस कार्लसन याचा ग्रुनफेल्ड अवलंबण्याचा निर्णय ही आनंदसाठी आश्चर्यदायक बाब होती; तरी आनंदने चांगली तयारी केल्याचे दिसताना पाचव्या चालीवर (5.बीडी2) मॅग्नस कार्लसनला संभ्रमात टाकण्यासाठी आपल्या उंटासाठी असाधारण रांग निवडली. मॅग्नस कार्लसनने नवव्या खेळीवर उंट जी 4 ने प्रत्त्युत्तर दिले. उंटची जी 4 चाल निवडून मॅग्नस कार्लसन याने आपण उत्कृष्ट तयारी केल्याचे परिमाण दिले; तर आनंदने 13व्या चालीवर आपल्या राजाचे वजीराकडील विभागात कॅसलिंग करत सर्वाना आश्चर्यचकित केले. 
पहिल्या काही चाली दोन्ही खेळाडूंकडून अपेक्षेपेक्षा खूपच जलद झाल्या. उत्तम तयारी दर्शवत आपल्या घडय़ाळावर आनंदने केवळ अध्र्यातासात 13 चाली रचल्या. 21व्या चालीनंतर मात्र आनंदचे डावपेच बरोबर हेरत मॅग्नस कार्लसनने डावात सम-समान परिस्थिती आणली. शेवटी 48 व्या चालीत दोघांनीही बरोबरी मान्य केली.(वृत्तसंस्था) 
 
ग्रुनफेल्ड बचाव म्हणजे काय?
व्हिएन्नाचा (ऑस्ट्रिया) ग्रँडमास्टर ग्रुनफेल्ड याने 1922 मध्ये बॅट पिस्टेन येथे फ्रेडरिक सॅमीशविरुद्ध खेळताना आपल्या नावीन्यपूर्ण ओपनिंगचे सादरीकरण केले. पुढे त्याची हीच ओपनिंग पद्धत ग्रुनफेल्ड बचावपद्धती म्हणून लोकप्रिय झाली. जगज्जेत्या अनातोली कार्पोव आणि गॅरी कास्पारोव यांच्यातील विश्वविजेतेपदाच्या 1987 च्या स्पर्धेत सहा, तर 199क्च्या स्पर्धेत 4 डाव या पद्धतीने खेळले गेले होते.

 

Web Title: Ananda's drawing of draws!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.